Tuesday, June 30, 2020

" स्वतःचा ब्लॉग तयार करणे "

नमस्कार ,

मी हेमलता यादव-कदम (भोसले गार्डन सोसायटी, हडपसर-२८),

घरी बसून काही तरी उद्योग व्यवसाय करू पाहणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींसाठी हि माहिती मी देत आहे .. ज्यांना यशस्वी तर व्हायचंय पण योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये.. संपूर्ण लेख नक्की वाचा कदाचित तुम्हाला हि याचा फायदा होईल . 

मैत्रिणींनो तुमची सर्वांची मेहनत खूपच उल्लेखनीय आहे .. आणि त्या मेहनतीला तुम्ही जर योग्य स्वरूप दिलेत तर तुमच्या व्यवसायात वृद्धी होण्यास तुम्हाला मदत होईल. 
बऱ्याच महिला त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करताना खूप फोटोंचा वापर करतात. त्या मुळे खरेदी करणाऱ्या महिला कधी-कधी सर्व फोटो उघडून पाहत नाहीत .. जर लोकांनी आपली माहिती पूर्ण पहिली नाही तर त्यातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळायला अडचण येते .. आपल्याला जर आपल्या व्यवसायाची माहिती थोडक्यात पण अचूकपणे मांडता आली तर आपल्याला प्रतिसाद हि तसाच म्हणजे उत्तम प्रकारे मिळतो . सध्या ग्राहक दुकानात जाऊन काही खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीला अधिक महत्व देत आहेत. मग आपले ऑनलाईन सादरीकरण चांगले असायला हवे ना .. याच सादरीकरणासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे  " स्वतःचा ब्लॉग तयार करणे " 

ब्लॉग चे फायदे : 

१. फोटो आणि माहिती टाकण्याची मर्यादा नाही 

२. १५ - २० फोटो पाठ्वण्याऐवजी एक लिंक पाठवणे कधी हि सोपे असते,

        A.  त्यामुळे व्हाट्सअप ग्रुप मध्ये खूप फोटो ऐवजी थोडी माहिती आणि लिंक असे पाठवले तर ते अधिक प्रोफेशनल दिसेल. 
        B. शिवाय माहिती पाठवताना काही राहिले किंवा जास्तच पाठवले अशा चुका होणार नाही. 
        C. हि लिंक स्टेटस ला हि ठेवता येते . 
        D. आपल्या कामाची सविस्तर माहिती असल्याने ग्राहकांना खरेदी चा निर्णय पटकन घेता येतो . 
( उदा. साठी  पुढील लिंक ओपन करून पहा . https://recipesforgr8health.blogspot.com/ )

३. सध्या सर्वच लोक ऑनलाईन पद्धतीने पुढे जात असल्याने तुम्ही जर तुमच्या "व्यवसायाचे सादरीकरण " चांगल्या पद्धतीने केले . तर तुमच्या वस्तूनाही चांगली मागणी येईल . 

४. शिवाय तुमच्या  ब्लॉग वर खूप लोक येत राहिली तर तुम्हाला ब्लॉग तर्फे काही जाहिराती मिळतात आणि ब्लॉग कडून त्या जाहिराती चे पैसे हि तुम्हाला दिले जातात .. 
म्हणजेच तुमचा जास्त फायदा ब्लॉग तयार करण्याने होतो .. 

५. ब्लॉग तयार करायला सुरवातीला तुम्हाला कोणतेही शुल्क नसते . फक्त ई-मेल आय डी असावा लागतो . 

६. ब्लॉग म्हणजे तुमचे ऑनलाईन असे दुकान आहे ज्याचे rent , lightbill , तुम्हाला दर महिना अजिबात भरावे लागणार नाही .. 

ब्लॉग तुम्ही स्वतः हि तयार करू शकता त्यासाठी पुढे एक साईट  दिली आहे www.blogger.com

तुम्हा सर्वांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी माझ्याकडून सर्व मैत्रिणींना एक छोटासा सल्ला आणि  खूप खूप सदिच्छा. (All The Best). 




Search Results

Web result with site links