Saturday, March 2, 2024

उतार वयात पैशांच्या काठीचा आधार महत्वाचा असतो.

उतार वयात पैशांच्या काठीचा आधार महत्वाचा असतो. 




वय वाढत गेले कि , शरीराला काठीचा आधार घ्यावा लागतो तसेच दैनंदिन व्यवहारासाठी माणसाला पैशाचा आधार हवा असतो जो पर्यंत आपण नोकरी करू शकतो तो पर्यंत ठीक आहे पण जेव्हा नोकरी करणे बंद होईल तेव्हा काय ? जरी पेन्शन मिळाली तरी ती माफक असेलच आणि महागाई प्रमाणे ती पुरेलच याची काय गॅरेंटी ? गुंतवणुकीचे अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाचे काही फायदे तर काही तोटे आहेत. अर्धवट ज्ञानाच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नका , कारण उतार वयात दैनंदिन व्यवहारासाठी पैशांच्या काठीचा आधार आवश्यकच असतो त्यामुळे प्रत्यक्ष भेटा शांतपणे सर्वकाही समजून घ्या. 
कृपया पुढील लिंक वर क्लीक करून स्वतःची माहिती भरा आमचे प्रतिनिधी तुम्हाला भेटून सर्व माहिती देतील. 

१) पेन्शन प्लॅन का घ्यायला हवा ?
२) पेन्शन प्लॅन किती रकमेचा असावा 
३) पेन्शन प्लॅन चे फायदे काय ? 
४) वाढत्या महागाई मुळे पैसे किती हि असले तरी त्या-त्या वेळेनुसार ते कमी पडणारच !
५) निवृत्तीनंतर चे वेतन हे त्या काळानुसार म्हणजे वाढत्या महागाईसोबत समायोजन साधणारे कसे असावे ? या बद्दल देखील आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल. 
६) बऱ्याच ऑनलाईन व्हिडिओ मध्ये अपुरी आणि स्वप्नरंजनात्मक माहिती दिली जाते त्यामुळे त्यावर आधारित राहून निर्णय घेण्यापेक्षा प्रत्यक्ष financial advisor ला भेटा आणि स्वतःचे आर्थिक नियोजन करण्यासाठी थोडासा वेळ द्या. 

आता लगेच पुढील लिंक वर क्लिक करून  appointment घ्या . 

https://docs.google.com/forms/d/113Fy_1X4z5QZkf9GjL5hLBBpo8aOVAxde19X9hTL_qc/edit

धन्यवाद
हेमा यादव - कदम
९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९
नवी पेठ , पुंणे - ३०



Tuesday, February 20, 2024

चला "फिकर-फ्री" म्हणजेच "चिंतामुक्त" आयुष्य जगण्यासाठी आजच भेटूया.

 नमस्कार , 


चला "फिकर-फ्री" म्हणजेच "चिंतामुक्त" आयुष्य जगण्यासाठी आजच भेटूया. 

TATA AIA चा  PARAM RAKSHAK PRO प्लॅन म्हणजे चिंतामुक्त आयुष्याकडे जाण्याचा सुखकर मार्ग , आर्थिक नियोजन हा खूप महत्वाचा भाग आहे त्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार !  वयाच्या ६०-६५ नंतर आपण पैसे कमावण्यासाठी सक्षम तर नसतोच पण नव-नवीन बदलांमुळे कुठे काम पण मिळणार नाही, पेन्शन सर्वानाच मिळत नाही, आणि मिळत असेल तरी ती पुरी पडेल याची काय खात्री ? कारण महागाई तर वाढत राहणार ! त्यामुळे योग्य  वयातच गुंतवणूक करायला सुरवात करा, TATA तुमच्या साठी घेऊन आले आहे PARAM RAKSHAK PRO PLAN या मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे आयुष्य खरंच चिंतामुक्त होऊन , आनंदाने आणि समाधानाने जगू शकता . हा प्लॅन तुम्हाला पुढील गोष्टींसाठी मदत करणार आहे १) for creating wealth २) achieve life's goals ३) health and wellness  ४) tax benefit 

या प्लॅन च्या अधिक माहिती साठी आणि तुमच्या गरजेनुसार तुमच्या साठी कोणता प्लॅन योग्य आहे., हे समजून घेण्यासाठी आजच वेळ काढा आपण भेटून या विषयावर नक्की चर्चा करू , TATA या विश्वासाहार्य ब्रँड चे प्रतिनिधी म्हणून आमचे काम आहे गुंतवणुकीविषयी जनजागृती करणे, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणे , गुंतवणूक करायची कि नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न असणार आहे ., आमचा आग्रह नाही. त्यामुळे स्वतःच्या आर्थिक नियोजनासाठी आजच वेळ काढा , भेटा , आणि समजून घ्या म्हणजे "फिकर - फ्री" आयुष्य जगण्याची सुरवात करता येईल ... 

धन्यवाद 
हेमा यादव - कदम 
९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९
नवी पेठ , पुंणे - ३० 


Monday, October 23, 2023

"आर्थिक तडजोड / संघर्ष करणे म्हणजेच आयुष्य जगणे नसते"

 गुंतवणूक करताना नेहमी आपली गरज पाहून आपण गुंतवणूक करायची. ती किमान ४-५ वेग-वेगळ्या प्रकारात असावी जेणेकरून गरज असेल तेव्हा कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये : 

१) PPF AC :  
a) वर्षाला किमानरु ५०० पासून १ लाख ५० हजार पर्यंत आपण पैसे टाकू शकतो , 
b) व्याज जास्त मिळते , तसेच व्याजावर व्याज दिले जाते , 
c) १५ वर्ष AMOUNT FIXED राहते ,
 
२) लाईफ इन्शुरन्स : 

a) हॉस्पिकेअर आणि क्रिटिकल इलनेस (एकूण ४० प्रकारचे) यामध्ये समाविष्ट असतात. 
b) आजारपणामुळे होणारे खर्च हे अचानक समोर येतात आणि ते करणे आवश्यक असते , 
या अचानक आलेल्या खर्चांमुळे आपले  महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडते त्यामुळे life insurance आणि mediclaim या दोन्ही गोष्टी जवळ असणे गरजेचे असते. 
c) वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत आहेत त्यामुळे पूर्वतयारी असायलाच हवी. 
d) तसेच जर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असेल तर आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला ठराविक रक्कम देखील दिली जाते 
e) जर तुम्हाला काही झाले नाही तर return of premium चा पर्याय देखील असतो पण त्याचा प्रीमियम जास्त असतो ( हा पर्याय घ्यायचा कि नाही हे पूर्णपणे तुमच्या आवश्यकतेनुसार ठरवावे) 

3) MEDICLAIM :
a) लाईफ इन्शुरन्स चे रायडर हे मोठ्या आजारांमध्ये मदत करतात पण लहान सहान आजारांना मेडिक्लेम शिवाय पर्याय नाही. 
b) जर तुम्ही टायफाईड , पोटदुखी किंवा कोणत्याही छोट्या गोष्टींसाठी ऍडमिट झाले तर इथे मेडिक्लेम उपयोगी पडतो. 
c) एका व्यक्ती साठी ३ ते ५ लाखाच्या मेडिक्लेम साठी फक्त ५०० ते ८०० रु चा हफ्ता पडतो. 

4) SIP , MUTUAL FUND , SHARE MARKET : 

a) इथे LONG TERM गुंतवणूक करायची , 
b) यामध्ये  कधी हि कितीही गुंतवणूक तुम्ही करू शकता (योग्य कंपन्या निवडता आल्या पाहिजे अभ्यास पूर्वक)
c) याचा महत्वाचा फायदा हा असतो कि, परतावा चांगला मिळतो. शिवाय आपल्याला गरज असेल तेव्हा आपण ते काढू शकतो ४८ तासात तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. 

5) RETIREMENT PLAN : आयुष्य हे फक्त खस्ता खाण्यासाठी नसून आनंदाने जगण्यासाठी हि असते त्यामुळे कधी व कुठे थांबायचे हे कळायला हवे. योग्य वेळेत गुंतवणूक करायला सुरवात केली कि मग एका विशिष्ट वयानंतर फक्त आवड म्हणून काम करायचे , स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगायचे ... 

तुम्ही हि केले आहे ना असे छान फायनान्शियल प्लॅनिंग केले असेल तर उत्तमच पण नसेल केले तर एकदा जरूर संपर्क करा आणि तुमच्या आवश्यकतेनुसार दर महिना काहीतरी गुंतवणूक सुरु करा. 

धन्यवाद 
हेमा यादव - कदम (LP)
TATA AIA 
९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९ 



Monday, July 24, 2023

VADHU VAR PASANTI MATRIMONY SERVICES

 नमस्कार , 


हा क्रमांक श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ (वाई-पुणे) तर्फे चालविण्यात येणाऱ्या वधु - वर पसंती संस्थेचा आहे.  विवाह जमविण्यासाठी आपल्याला अधिका-धिक स्थळाची आवश्यकता असते., पण एक किंवा दोन ठिकाणी नाव नोंदणी करून लगेच मनासारखे स्थळ मिळेल याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे अधिकाधिक ठिकाणी आपली नोंदणी असणे आवश्यक असते. कारण कुठूनही कधीही गोष्टी पटकन जुळून येऊ शकतात. विवाह जमविण्यासाठी तुमचे जे काही प्रयत्न आता सुरु आहेत त्यात आमची संस्था हि एक उत्तम मार्ग असू शकेल , 


कारण : 

1) अत्यंत कमी सेवा शुल्क : 


वार्षिक नोंदणी रु १२००/- फक्त 

आणि विवाह जमेपर्यंत रु १५००/- रु फक्त 


2) विवाहाच्या दृष्टीने पत्रिका देखील पहिली जाते. 

विवाह योग- ५०१/- (विवाहपूर्व विषयासंबंधी सर्व प्रश्न)

करिअर योग - ५०१/- (यश , प्रगती यासंबंधी सर्व प्रश्न)

आर्थिक , कौटुंबिक किंवा इतर प्रश्न  १००१ /- 


3) जर निर्णय घेण्यात गोंधळ होत असेल तर समुपदेशन सेवा देखील उपलब्ध आहे 

विवाहपूर्व समुपदेशन :  १०००/-रु 

विवाह पश्चात समुपदेशन : १०००/- रु 


4) काही स्थळांसोबत जर आम्ही बोलण्याची आवश्यकता असेल तर तसेही कळवू शकता आम्ही स्वतः त्या ठराविक स्थळांसोबत तुमच्यासाठी संपर्क करू . (मध्यस्ती सेवा / मीटिंग सर्विस) 


5) तुम्हाला वृत्तपत्रात जाहिरात द्यायची असेल तर ती हि आपल्या संस्थेतर्फे तुम्हाला देता येईल , स्थळाची योग्य पद्धतीने चौकशी करून मगच स्थळ तुम्हाला पुढे पाठवले जाईल आमच्या चौकशीच्या पद्धतीमुळे कदाचित फसवणुक टाळता येऊ शकते. 


6) तसेच विविध वैयक्तिक सेवा (Personalized Service) देखील उपलब्ध आहेत . यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन घ्यावे लागेल. 


विवाह जमेपर्यंत प्रयत्न करत राहणे हे आपले काम आहे ., पुणे - मुंबई सारख्या ठिकाणी आपण राहत आहोत जिथे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे., म्हणजे शोध कार्य देखील त्या पटीने व्हायला हवे ,  अशा वेळी फक्त १ आणि २ ठिकाणी नाव नोंदणी असून उपयोग आहे का ? याचा विचार तुम्हीच करा , जितक्या लवकर विवाह जमून यावा असे वाटत असेल तितके जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. वेळ वाया न घालवता लगेच च नोंदणी करा आणि शोधकार्याचा वेग वाढवा.  


GOOGLE PAY / PHONE PAY NUMBER : 9766271744

Bank Details :

Name  :  Hemlata Suresh Yadav 

Bank Name  : ICICI BANK 

Account Number : 624001572309

IFSC Code : ICIC0006240

Location : Pune 


( वरील सर्व सेवा फक्त ब्राह्मण , मराठा तसेच आंतरजातीय चालेल अशा सर्व जातीय प्रथम वधु - वर यासाठी आहे ). 


धन्यवाद

हेमा यादव-कदम

नवी पेठ पुणे ३०

९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९ 

https://www.vadhuvarpasanti.in

Friday, June 23, 2023

आर्थिक सुरक्षितता हि नुसते पैसे कमावल्याने नाही तर कमावलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्याने साध्य होते

 सुप्रभात. 


ज्यावेळी COMPUTER आणि INTERNET आले त्यावेळी अनेक प्रेस बंद पडले लोकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले त्यानंतर तंत्रज्ञानांत होणारी प्रगती पाहत पाहत आपण मोठे झालो. कोरोनामुळे ज्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले किंवा ज्या लोकांनी घरातील कर्ते लोक गमावले त्यांना MEDICLAIM , RETIREMENT PLAN , SAVING PLAN , TERM PLAN समजावण्याची गरज पडत नाही पण ज्यांनी हे अनुभव घेतले नाही त्यांना तर असे वाटते कि गुंतवणुकीची काही आवश्यकता च नाही ., लक्षात घ्या कि तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगती मुळे (ARTIFICIAL INTELLIGENCE, CHAT GPT) पुढील २० वर्षात अनेक नोकऱ्या धोक्यात येणार आहेत., त्यामुळे आता पासूनच दर महिना किमान ७-८ हजार रुपये कसे गुंतवता येतील याचा विचार करा ? बदलत जाणाऱ्या काळात हीच गुंतवणूक तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. 

जर अजूनही तुम्ही ठरवले नसेल कि , किती रुपयांचा MEDICLAIM घ्यायचा ? 
MUTUAL FUND मध्ये दर महा किती रक्कम भरावी ?
TERM PLAN कोणता घ्यायला हवा ? यात किती गुंतवणूक करायला पाहिजे ?
बँक, गोल्ड , पोस्ट , कुठे SAVING करावी ?
कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षितेतच काय ? 

लक्षात घ्या कि , आर्थिक सुरक्षितता हि नुसते पैसे कमावल्याने नाही तर कमावलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्याने साध्य होते. दर महा अगदी १५०० ते ५००० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरवात करा. विनाकारण वेळ वाया घालवू नका, लवकर निर्णय घ्या. लगेच पुढील क्रमांकावर ७८७५५५०७८९   संपर्क करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन APPOINTMENT घ्या. आणि तुमच्या उत्पन्ना नुसार तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी तुम्ही दर महा किती आणि कुठे-कुठे गुंतवणूक करायला हवी हे समजून घ्या.  

धन्यवाद 
हेमा यादव कदम 
७८७५५५०७८९ 
 

Friday, April 7, 2023

"वस्तू महत्त्वाची की व्यक्ती ?" इन्शुरन्स नक्की कोणाचा काढायला हवा. ?

 

"वस्तू महत्त्वाची की व्यक्ती ?"  इन्शुरन्स नक्की कोणाचा काढायला हवा. ?




आज काल मोबाईल आणि गाडी या दोन्ही गोष्टींचा इन्शुरन्स आपण आवर्जून करतो पण घरातील कर्त्या व्यक्तीचा इन्शुरन्स आपण करत नाही. वस्तू खराब झाली तर दुसरी घेता येते पण कर्त्या व्यक्तीचे नुकसान (स्त्री असो वा पुरुष ) भरून काढता येत नाही. तरीही life insurance कडे आपण सरळ सरळ दुर्लक्ष करतो. ज्यांनी अपघातात किंवा कोरोना काळात अचानक घरातील कर्ती व्यक्ती गमावली त्या कुटुंबाची त्या व्यक्ती पश्चात झालेली अवस्था कधी तरी पाहून या मग life insurance किती महत्वाचा आहे हे तुम्हाला कळेल.

तुम्ही जर कुटुंब प्रमुख असाल किंवा तुमची स्वतःची कंपनी असेल , तर तुमच्यावर तुमचे एकच कुटुंब नाही तर तुमच्या कंपनीतील काम करणाऱ्या प्रत्येक EMPLOYEE चे कुटुंब तुम्ही दिलेल्या पगारावर चालणार आहे त्यामुळे तुम्ही कुटुंबासाठी आणि कंपनी साठी देखील TATA AIA  चे उत्तम प्लॅन एकदा समजून घेणे गरजेचे आहे. 

आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम राहावी हि कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी आहे , भौतिक गोष्टींवर खर्च करताना आपण अजिबात विचार करत नाही आणि नको तिकडे हजारो रुपये खर्च करून मोकळे होतो त्या हौसमौज करता करता जर तुम्ही थोडी बचत करायला सुरवात केलीत तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याचा आनंद घेऊ शकता कोणाकडे हि आर्थिक मदत न मागता ... 


टाटा कंपनी चे खूप उत्तम insurance plan आहेत, money back policy सुद्धा आहेत.आजच संपर्क करा प्लॅन समजून, फायदे समजून घ्या. आज तुम्ही मला दिलेला तुमचा थोडा वेळ तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरणार आहे., तुमच्या प्रियजनांना वाढदिवसासाठी तुम्हाला आवडलेला एखादा छान इन्शुरन्स प्लॅन द्या. ज्यामुळे भविष्यात तुमच्या जवळच्या लोकांना कोणाकडूनही आर्थिक मदत घेण्याची आवश्यकता राहणार नाही. आणि जर तुम्ही money back चा पर्याय घेतला तर तुम्हाला तुम्ही भरलेली रक्कम इंटरेस्ट सह परत मिळते त्या निमित्ताने तुमची  छान saving होते. 

कोणत्याही गोष्टीला सकारात्मक पद्धतीने घेतले तर आयुष्यात कधीही आर्थिक नुकसानीसाठी रडत बसण्याची वेळ येणार नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या कि वस्तू दुसरी घेता येते गमावलेली व्यक्ती परत मिळवता येत नाही महत्व कोणत्या गोष्टीला द्यायचे तुम्ही ठरवा. 

TATA AIA LIFE INSURANCE चे उत्तम प्लॅन समजून घेण्यासाठी आजच व्हाट्सअप करा ७८७५५५०७८९



Sunday, July 26, 2020

"आपल्या व्यवसायाचं पुढे काय होणार? " - (एक मुलाखत)

 नमस्कार मैत्रिणींनो सध्या प्रत्येकाच्या मनात कोरोना मुळे "आपल्या व्यवसायाचं पुढे काय होणार? "
हा प्रश्न आहेच मार्च मध्ये अशाच काही प्रश्नांवर सहजच मी एका उद्योजकांची मुलाखत घेतली होती त्यातून मला मार्गदर्शन मिळाले तीच चर्चा किंवा मुलाखत मी तुमच्या सोबत share करत आहे नक्की वाचा. 


प्रश्न : हि आर्थिक मंदी साधारण दोन ते अडीच वर्ष राहणार लगेच भरून निघणे शक्य नाही मग सर्वात जास्त फटका कोणत्या उद्योगांना बसेल ? 

उत्तर : High ticket items,  luxury products,  things which are not purchased by middle class and lower class.

(हौशी - मौजी साठीचे खर्च कमी होतील , लोकांचे पगार आणि व्यावसायिक उत्पन्न कमी झाल्याने कदाचित savings  वर लोकांचा भर जास्त राहील. आणि हे करणे आवश्यक असणार आहे ) 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न : सेवा क्षेत्रावर याचा काय परिणाम होईल ? 
उत्तर :  Medicine,  law,  etc will not be affected. 

(औषधे आणि कायद्याशी निगडित काही ठराविक क्षेत्र सोडली तर प्रत्येक क्षेत्रावर कोरोनामुळे आर्थिक परिणाम झालेले दिसतील . )
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न : लोकांचा चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा कल कमी होऊन फक्त जीवनावश्यक वस्तू च्या खरेदीवर भर राहील का?
उत्तर :  Yes mostly

(नक्कीच , कारण उत्पन्न कमी तर खर्च हि कमीच असणार . ) 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न : बँक पुढील काळात जास्त कर्ज देऊ शकणार नाहीत. मग याचा परिणाम Realestate वर होणारच , त्याचे दुष्परिणाम साधारण काय होतील? 
उत्तर : ( buy , sell , rent ) 
1st thing is existing oc received houses need to be liquidated,  redevelopment projects,  then new open land properties dealings.  
Growth in commercial property dealings will be limited by slow down, customers will prefer ready to move in houses as they may not be comfortable blocking their money. 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न : फायनान्स करणाऱ्या कंपनी यांचे काय होईल ? म्हणजे जास्त व्याजदर लावून ते मोठे होतील कि फायनान्स साठी त्यांना ग्राहक च मिळणार नाहीत . 
उत्तर : Finance will be available at reduced rate of interest 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न : महागाई थोड्याच दिवसात डोके वर काढणार , आपल्याकडे ७०-८०% वर्ग माध्यम वर्गीय आहे , या लोकांना स्वतःच्या गरजा पूर्ण करून गुंतवणूक करणे शक्य होईल का?
उत्तर : If people can retain jobs savings will be possible and if saving happens investment will also be possible.  

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रश्न : सध्याची परिस्थिती मध्ये share market मध्ये गुंतवणूक करणे कितपत योग्य आहे . 
उत्तर : Share market works on sentiments and if overall sentiments are not happy the market will be jittery unstable.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न : कोणते व्यवसाय क्षेत्र असे असेल कि जे खूप जास्त loss मध्ये जाणार नाही. 
उत्तर : Fast moving consumer goods. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न : कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सध्याची परिस्थिती योग्य आहे असे मला वाटत नाही पण तुम्हाला असे वाटते का कि एखाद्या कोणत्या टिपिकल व्यवसाय मध्ये केलेली गुंतवणूक वाया जाणार नाही?
उत्तर : Difficult situation need to observe next 3 to 6 months how market is reacting. 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न : यातून बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे 
उत्तर : 
१) थांबा आणि वाट पहा . 
२)  कोणत्याही  व्यवसायात पैसे गुतवण्याआधी , ते परत आपल्याकडे कसे येतील याचे मार्ग शोधून ठेवा . 
३)  मार्केटचा अभ्यास आणि लोकांची गरज ओळखून त्या - त्या महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा . 
४)  कोणत्याही प्रकारे अनावश्यक खर्च टाळा 
५)  छोटी - मोठी कर्ज जर शक्य असेल तर कमी करून टाका (हफ्ते आणि व्याज ) यातुन मोकळे व्हा . 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न :  सध्याची परिस्थिती ला संधी म्हणून पाहावे कि अडचण म्हणून .. 
उत्तर :  Opportunity but after evaluating threats

(जसे आधी सांगितले तसे कि मार्केट चा अभ्यास करून त्याप्रमाणे व्यवसायात बदल करा आणि व्यवसायात परिस्थितीनुसार बदल करा , जुन्या पद्धतीने चालत राहू नका .  )
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

वरील सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केल्यावर काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या पुढील प्रमाणे 

सर्वात आधी प्रत्येकाने आवश्यक आणि अनावश्यक खर्च याची एक यादी करावी (हे खर्च म्हणजे व्यावसायिक खर्च. उदा . जाहिरात मिटींग्स साठी होणारे खर्च etc ) 
शक्य असल्यास त्यातील अनावश्यक खर्च कमी करणे 

ऑनलाईन मार्केटिंग आणि विक्री शिकून घ्यावी 

जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्या पद्धतीने social media मार्केटिंग द्वारे स्वतःचे अस्तित्व ( म्हणजे व्यावसायिक अस्तित्व ) तयार करणे 

कोणत्याही एका व्यवसायावर अवलंबुन न राहता आप-आपल्या क्षेत्रातील नव-नवीन/वेगवेगळ्या व्यवसाय संधी शोधणे आणि व्यवस्तीत अभ्यास करून त्यातून अर्थार्जनामध्ये स्थैर्य वाढवण्याचा प्रयत्न करणे. 

ऑल द बेस्ट 




Thursday, July 23, 2020

sell on amazon (amazon वर विक्री)



Amazon कंपनी सध्या घरपोच सामान पोहचवणारी  सर्वात मोठी कंपनी आहे जर या कंपनी सोबत तुम्हाला काम करायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा स्वतःचे seller account सुरु करा तुमची वस्तू ग्राहकांनी खरेदी केली कि ,  amazon कंपनी ७ - १५ दिवसात पैसे तुमच्या खात्यात जमा करते हा सर्वात मोठा पर्याय आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा ... हा हि एक प्रयत्न करून पहा ....

https://services.amazon.in/services/sell-on-amazon/how-it-works.html


गूगल जाहिरात (google ad words) lecture number 5


                 आपल्या वस्तूंची जाहिरात गूगल द्वारे करणे म्हणजे क्षणभरात अब्जो लोकांपर्यंत पोहचणे ... खरं तर आपल्याला सध्या जगभरात नाही तर फक्त महाराष्ट्रात च आपला व्यवसाय वाढवायचा आहे ... पण त्यासाठी काय करायचे हा एक प्रश्न असतोच.... याची अनेक उत्तरे आहेत त्यातील एक म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपला व्यवसाय कसा पोहचेल अशी व्यवस्था करणे , थोडक्यात सांगायचे तर तुम्ही जर तुमच्या व्यवसायाची माहिती १० लोकांना दिली तर त्यातून १ व्यक्ती आपली सेवा किंवा वस्तू खरेदी करते याचाच अर्थ तुम्ही सोने विका किंवा माती तुम्हाला मार्केटचा १० टक्के रिस्पॉन्स नक्की मिळणार मग जर तुमची इच्छा असेल कि तुमची वस्तू किंवा सेवा ५०-१०० लोकांनी खरेदी करावी तर त्यासाठी किती लोकांपर्यंत माहिती पोहचायला पाहिजे ते तुम्ही ठरवा.. आता या नवीन लोकांपर्यंत पोहचण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे गूगल वर जाहिरात करणे , गूगल जगभरतील सर्वात मोठे search engine आहे , आपण त्यावर काही हि शब्द टाकले कि त्यासंभंधित आपल्याला गूगल २५-५० लिंक एकाच पानावर दाखवते .. व्यवसायाच्या पब्लिसिटी चा सर्वात चांगला मार्ग आहे गूगल ad-words आणि या जाहिराती करणे हि सोपे आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

त्यासाठी खालील ६-७ पायऱ्या पूर्ण केल्या कि गुगल वर जाहिराती करता येतात .. 

पायरी 1 : Google च्या जाहिराती वेबसाइटवर जा 



Https://ads.google.com वर जा. त्यानंतर आपणास दिसेल, ( get started) “आता प्रारंभ करा.” त्यावर क्लिक करा आणि आपल्या Google जाहिराती खात्यासाठी साइन अप करा. त्यानंतर आपण “आपली पहिली मोहीम(Campaign) तयार करा” असे म्हटलेल्या बटणावर क्लिक करू शकता.  
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पायरी २ : तुमच्या campaign (मोहीम) साठी नाव व प्रकार निवडा
               तुमच्या मोहिमेसाठी पर्याय असतील, जेव्हा तुम्ही सुरवात करत असाल (getting started) तेव्हा search network only हा पर्याय सर्वात चांगला. 

मोहिमेचे नाव : तुमच्या campaign चे नाव हे तुमच्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या सम्बधीत असावे ज्याची तुम्हाला जाहिरात करावयाची आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पायरी ३ : तुमची जाहिरात प्रकाशित करण्याचे ठिकाण( Ad display location) निवडा 
               तुमच्याकडे जाहिरात प्रकाशित करण्यासाठी बरेच पर्याय असतात. तुम्ही छोट्या अथवा मोठ्या आकाराचे क्षेत्र निवडू शकता. उदा. एखादे शहर अथवा पूर्ण देश. तसेच तुम्हाला एखादा विशिष्ठ भाग निवडायचा असल्यास तुम्ही त्या भागाचे अक्षांश व रेखांश देखील निवडू शकता. 

             तुम्हाला तुमच्या आदर्श ग्राहकांच्या ठिकाणाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या स्थानिक व्यवसायाचे मालक असाल तर तुम्ही तुमच्या भागातील ग्राहकांना लक्ष्य करणे अपेक्षित आहे. जर तुम्ही तुमची सेवा अथवा वस्तू या संपूर्ण देशभर पुरविणार असाल तर तुम्ही पूर्ण देश तुमचे Ad location म्हणून निवडू शकता. जे त्यांचा व्यापार हा आंतराराष्ट्रीय पातळीवर करणार असतील त्यांनी ज्या ठिकाणी सर्वाधिक व्यापार होत असेल अथवा जेथे सर्वांत जास्त ग्राहक असतील त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त मोहिमा राबविणे आवश्यक भासू शकते. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पायरी ४ : तुमचा दैनिक अर्थसंकल्प(Daily Budget) तयार करा. 

               जोपर्यंत तुम्ही गुगल ऍड्स वापरण्यात प्रविण होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे बजेट कमीत कमी ठेवणे उत्तम, ज्यायोगे तुम्ही सावधपणे सुरवात करून, माहिती(data) जमा करू शकता आणि त्यानंतर जेथे अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे तेथे तुम्ही विस्तार करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या campaign मध्ये पारंगत व्हाल. लक्षात ठेवा गुगल ऍड्स तुमच्या दैनिक बजेटच्या जास्त जाऊ शकते आणि बऱ्याच वेळेस ते जातेच त्यामुळे तुम्ही तुमच्या मोहिमांवर (campaign) दर आठवड्यात लक्ष्य ठेवणे आवश्यक असते ज्यायोगे तुम्ही तुमच्या बजेटवर दर आठवड्याला आवश्यक ते बदल करून तुमच्या मासिक बजेटच्या जवळपास तुमचा खर्च मर्यादित ठेवू शकता. 

               तुम्ही तुमचे देयक (payment options) भरण्याचे पर्याय निवडा. 
१ स्वतः देयक अदा करा (Manual Payment) :- यात तुम्ही तुमची जाहिरात प्रकाशित होण्याआधी देयक अदा करता. 

२ स्वयंचलित पद्धतीने देयक अदा करा (Automatic Payment) :- यात तुम्ही तुमचे गुगल ऍड्सचे खाते तुमच्या बँकेच्या खात्यास अथवा क्रेडिट कार्ड ला लिंक करता व तुमच्या खात्यातून जाहिरातीचे देयक अदा केले जाते. 

३ महिन्याचे देयक अदा करा (Monthly Invoice) :- हा पर्याय गुगल काही व्यावसायिकांना उपलब्ध करून देते जे त्यांच्या अटी व शर्तीमध्ये पात्र असतात. यात गुगल तुम्हाला महिन्याचे बिल एकत्र भरण्याची मुभा देते, तुम्हाला दर जाहिरातीसाठी पैसे भरणे गरजेचे नसते. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पायरी ५ : कीवर्ड तयार करा 
               पहिल्यांदा जाहिरात देणाऱ्यांसाठी हे थोडी अवघड गोष्ट ठरू शकते. यात तुमचा कल हा तुमच्या व्यवसायाबद्दल जास्तीत जास्त माहिती देणारे कीवर्डस जमा करण्याकडे असू शकतो. आणि प्रत्यक्षात गुगलही तुमच्याकडून हीच अपेक्षा करते ज्यायोगे  तुम्ही जास्तीत जास्त पैसे खर्च करता. 

                  पण हा मोह टाळा आणि अशा शब्दांकडे लक्ष्य द्या जे कमीत कमी शब्दांत जास्त माहिती देतात. हे असे शब्द असतात की ज्यात कुठलाही संशय उरत नाही की जेव्हा एखादी व्यक्ती जे काही शोधत आहे ते तुम्हीच पुरवीत आहात आणि असे शब्द मोजकेच असतात. त्यामळे असे शब्द सुचवू नका की ज्यायोगे तुम्ही पुरवीत असलेली सेवा अथवा वस्तू आणि तुम्ही सुचविलेले शब्द यामुळे काही शंका उदभवू शकते. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पायरी ६ : जाहिरात तयार करा
               येथून पुढे खरे काम सुरु होते. आपल्याला अशी जाहिरात तयार करायची असते जी आपल्या ग्राहकांना आकर्षित करेल आणि आपल्या वेबसाईटवर जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करेल. गुगलच्या सर्च बारमध्ये त्यांनी वापरलेल्या कीवर्ड असलेल्या जाहिरातींवर क्लिक करण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच आपण आपले ग्राहक वापरत असलेल्या कीवर्ड्स असलेल्या वाक्यांचे (कीवर्ड संशोधनानंतर) लक्ष्य करत असल्यास तुमच्या    पहिल्या किंवा दुसऱ्या मथळ्यात(Headline) ते कीवर्ड अथवा वाक्यांश असतील याची खात्री करा. 
            जाहिरातीच्या मथळ्यानंतर तुम्ही मसुद्याकडे वळू शकता. यात तुम्ही तुमच्या सेवा अथवा उत्पादनांच्या मुख्य फायद्यांकडे लक्ष्य केंद्रित करा. जर काही खास सवलत असेल तर तिचे वर्णन करा आणि नंतर तुमच्या उत्पादनासाठी पुन्हा एकदा आकर्षित करा.
                     शेवटी तुम्ही ग्राहकांना तुमच्या लैंडिंग पेजवर पाठवता जे तुमच्या जाहिरातीशी मिलते-जुलते असते. यावरून तुम्ही सुनिश्चित करू शकता की जाहिरातील माहिती landing page वर प्रतिबिंबीत झालेली आहे, ज्यामुळे चांगले रूपांतर होईल. बऱ्याचदा लोक अशी चूक करतात की जाहिरात सेट करताना विशेष सवलतीचा उल्लेख करतता परन्तु जाहिरात बघून home page वर गेल्यावर त्या सवलतीचा कोणताही उल्लेख नसतो. यामुळे आपल्या पड़री केवळ निराशा येते. तुम्ही वापरलेले कीवर्ड्स आणि वाक्यांश यांचा तुमच्या landing page वर प्रकर्षाने उल्लेख हवा. 
            

पायरी ७: कन्वरशन ट्रॅकिंग सेट करा 
                  शेवटची पायरी म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी योग्य अशा कन्वरशन ट्रॅकिंग सेट करणे, यासाठी गुगल तुम्हाला खालीलप्रमाणे पर्याय देते. 

  1. Webform leads (उदा. दरपत्रक मागणी [Quote request ]
  2. ई-कॉमर्स ऑर्डर्स (उदा. तुमच्या शॉपिंग पोर्टल वरून आलेल्या ऑर्डर्स)
  3. कॉल्स फ्रॉम ads (उदा. जाहिरातीत प्रकाशित केलेल्या फोन नंबर वरुन आलेले फोन.)
  4. वेबसाईटवरून आलेले कॉल्स (उदा. वेबसाईटवर उल्लेखलेल्या नंबर वरुन आलेले फ़ोन.)
  5. इंटरनेटवरील विक्रीतून होणारी आयात. 

                 आपण जाहिराती चालू करण्यापूर्वी सर्व कन्वरशन ट्रॅकिंग सेट केले असल्याची खात्री करुन घ्या. अन्यथा, आपल्या जाहिरातींचा प्रभाविपणा आपण मोजू शकणार नाही. 



मोहिमांचा प्रभावी मागोवा घेणे, समायोजित करणे आणि यशस्वी होणे (Tracking, Adjusting, & Conquering effective campaign )
                 आपली जाहिरात चालू असताना तिच्या परिमाणांचे विश्लेषण करत रहा. त्यातून आपल्याला काय चांगल्या प्रकारे सुरु आहे आणि कशात सुधारणेस वाव आहे हे समजण्यास मदत होईल. आपण आपल्या जाहिरातींकडे बारकाईने लक्ष्य दिल्यास, तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या सर्वोत्तम परिणाम मिळण्यास नक्कीच मदत होईल. 
                  आपले ग्राहक हे कोणत्या जाहिरातींसाठी सर्वात जास्त क्लिक करतात हे समजल्यावर आपण त्याप्रकारच्या जाहिराती जास्त प्रमाणात करू शकतो. यामुळे तुमचा कॉस्ट पर क्लिक कीवर्डस जास्त होउन  तुमच्या गुंतवणुकीवरील परतावा वाढतो (R.O.I. - Returns on Investment)
                 आता तुम्ही सुरवात करू शकता आणि एकदा तुम्ही यात उडी घेतली की तुम्ही अधिकाधिक शिकत जाल आणि तुम्हाला कळेल की गुगल ऍड्स हा तुमचा व्यवसाय वाढीसाठी हा चांगला पर्याय आहे. 


हे आर्टिकल इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे . ते आपल्या सर्वांसाठी मी मराठीत भाषांतरित केले आहे . 








Friday, July 17, 2020

" YouTube वर व्हिडिओ कसा अपलोड करायचा " (lecture 4)

पहिली पायरी आहे " व्हिडिओ तयार करणे" :
सर्वात आधी मोबाईल चा वापर करून छान व्हिडीओ तयार करा.  व्हिडीओ जर लहान असेल तर उत्तम .. कमी वेळात जर तुम्ही महत्वाची माहिती दिलीत तर जास्तीत जास्त लोक तुमच्या चॅनेल ला जॉईन होत जातात थोडक्यात व्हिडीओ कंटाळवाणे असू नये .

आपल्या यूट्यूब खात्यात (अकाउंट मध्ये) लॉग इन करा. (दुसऱ्या लेक्टर मध्ये आपण पाहिले कि चॅनेल कसा तयार करायचा ) त्यांनतर तुमच्या चॅनेल चे नाव तुम्हाला उजव्या कोपऱ्यात दिसेल त्यावर क्लिक करा मग तुम्हाला YouTube Studio असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .


YouTube Studio हा पर्याय निवडल्यानंतर खालील प्रमाणे स्क्रीन ओपन होईल.

आता ३ री पायरी म्हणजे "अपलोड" बटणावर क्लिक करा (लाल चौकोनात पहा)
अपलोड बटण पानाच्या उजव्या बाजूला आहे . त्यावर क्लिक केले कि पुढील स्क्रीन दिसेल



 आता select file या बटन वर क्लिक करून जो व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे तो निवडा

 व्हिडिओ अपलोड झाल्यावर योग्य ती माहिती भरा म्हणजे लोकांना तुमचा व्हिडिओ शोधणे सोपे जाईल .



या स्क्रीन वर तुम्हाला तुमचा अपलोड झालेला व्हिडीओ उजव्या बाजूला दिसेल आणि डाव्या बाजूला you tube तुम्हाला काही माहिती विचारते ,

a  Description :   यात तुमच्या व्हिडीओ बद्दल थोडक्यात माहिती लिहायची
b  Tags : म्हणजे तुमच्या व्हिडीओ संधर्भात असे काही शब्द टाकायचे कि लोकांना शोधणे सोपे होईल उदा , जर तुम्ही थालीपीठ चा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही (बेसन चे पदार्थ , थालीपीठ , इ .. ) असे शब्द टाकू शकता 
c . audience : म्हणजे लहान मुलांनी पहिले तर चालेल का ? कारण काही व्हिडीओ लहान मुलांसाठी नसतात म्हणून हा पर्याय youtube आपल्याला देते .

सर्व माहिती भरून झाली कि उजव्या बाजूला खाली next असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर

Video elements नावाचे पण उघडेल तिथे हि next बटन वर क्लिक करा. 

त्यानंतर visibility पण उघडेल तिथे व्हिडिओ पब्लिश करण्याबद्दल काही पर्याय असतील जसे कि व्हिडिओ privet ठेवायचा कि public 


या ठिकाणी तुम्हाला public हा पर्याय  निवडायचा आहे आणि शेवटी save या बटन वर क्लिक करायचे आहे . 

मग तुमचा व्हिडिओ अपलोड होऊन तुमच्या व्हिडिओ ची लिंक तयार होईल इच्छा असल्यास हि लिंक तुम्ही कोणत्याही social network वर टाकू शकता म्हणजे व्हाट्सअँप ./ इंस्टाग्राम / फेसबुक इ इ ...

YouTube मध्ये हि तुम्ही privacy setting द्वारे लोकांकडून येणाऱ्या कंमेंट hide करू शकता , तुम्ही approve केल्याशिवाय कमेंट दिसणार नाही असे हि करू शकता ..


आता पुढल्या लेक्टर मध्ये आपण YouTube मधील privacy setting शिकूया
तसेच त्यापुढील आपले LECTURE असेल कि  गूगल पे द्वारे  ऑनलाईन पेयमेन्ट कसे करायचे
तुम्हाला या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टींची माहिती हवी असेल तर नक्की विचारा ,