काही महिलांना घराबाहेर नोकरी करणे शक्य नसते आणि काही महिलांना नोकरी साठी घराबाहेर पडणे आवश्यक असते त्यात आता आपल्याकडे छोटी कुटुंब पद्धती असल्यामुळे लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्न असतो किंवा काही महिलांना घरून जरी काम करता येत असेल तरी लहान मुले पालकांना काम करू देत नाही अशा परिस्थिती मध्ये महिलांना लहान मुलांना सांभाळण्यासाठी कोणीतरी जबाबदार व्यक्तीच्या शोधात त्या असतात .. त्यामुळे मुलांसाठी डे केअर सर्व्हिसेस सुरु करणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो..
व्यवसाय आणि गुंतवणूक हे दोन विषय येणाऱ्या काळात आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावणार आहेत . फक्त नोकरी वर अवलंबून ना राहता इतर मार्गांचा हि आपण विचार करायला पाहिजे "कमीतकमी गुंतवणूक आणि जास्तीत जास्त फायदा" हा एकच हेतू नजरेसमोर ठेऊन हा ब्लॉग सुरु करत आहे आपल्या प्रतिक्रिया आणि प्रश्न नक्की कळवा yhem100@gmail.com
Saturday, May 23, 2020
"उन्हाळी पदार्थ तयार करून विकणे "
घराबाहेर जाऊन नोकरी करण्याऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे काही खास उन्हाळी पदार्थ बऱ्याच महिला विकत घेतात .. यामध्ये
नाचणीचे पापड
पालक पापड
तांदळाचे खिच्चे
सांडगे (डाळीचे वडे )
कुरड्या
खरावडे
बटाट्याचा खिस
बटाट्याचे पापड्या
उपवासासाठी चे पापड
घरी तयार केलेले मसाले /
हळद ई ...
हे पदार्थ जर महिलांना घरगुती पद्धतीने कोणी तयार करून दिले तर आधी त्यांना प्राधान्य दिले जाईल .. असे विविध पदार्थ जर तुम्हाला छान तयार करता येत असतील तर तुमच्या या पदार्थाना मागणी हि भरपूर मिळू शकते ..
" योग प्रशिक्षक " Yoga Trainer
आपल्याकडे बऱ्याच अशा महिला आहेत ज्या योग्य वयात स्वतःच्या तब्ब्येतीकडे लक्ष देत नाहीत मग एका ठराविक वयानंतर त्यांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो .. काही शारीरिक आजार तर व्यायामाणेच बरे होतात .. त्यामुळे योग हा एक अविभाज्य भाग आहे ... बऱ्याच गृहिणी आपल्या आजूबाजूला कोणी महिला योगा प्रशिक्षक नाही म्हणून हि योगा शिकण्यासाठी जात नाही आणि हा खूप मोठा वर्ग आहे .. जर तुम्ही स्वतः योग प्रशिक्षक बनलात तर यात खूप चांगल्या संधी उपलब्ध होतील शिवाय योगा एका ठराविक वेळेत शिकवता येतो त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवस व्यस्त राहण्याची गरज नाही .. तुम्हाला स्वतःला काही हि योग प्रशिक्षक बनण्यासाठी प्रशिक्षण घेता येते .. यासाठी वयाची अट नाही .. गूगल वर तुम्हाला तुमच्या घराजवळील योग प्रशिक्षक होण्यासाठी चे ट्रेनिंग सेंटर मिळतील .. सर्टिफिकेट कोर्से करता येतील .. या क्षेत्रातील संधी कालानुरूप वाढत च जाणार आहे .. महिलांनीच जर महिलांना त्याच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यास योग्य वयात प्रवृत्त केले तर कदाचित आपल्या महिलांना वृद्धत्वात होणारे त्रास हि कमी होतील .. प्रत्येक घरातील स्त्रीच्या हातात एका पूर्ण कुटुंबाचे आरोग्य असते त्यामुळे त्यांना योग आणि व्यायाम या दोन्हीचे महत्व असायला पाहिजे नाही का ? ☺☻
Thursday, May 14, 2020
ऑनलाईन शिकवण्या (classes)
जर आपण पुढील १ ते २ वर्षांचा विचार केला कोरोना सारख्या आजारामुळे घरातील सर्वानीच बाहेर जाऊन नोकऱ्या करणे शक्य नाही कमीत कमी या आजारावर औषध मिळे पर्यंत तरी .. त्यामुळे या ब्लॉग द्वारे महिलांना घरातून काही काम करता येण्यासारखे आहे का ? या बद्दल माहिती घेणार आहोत , ज्यामुळे आपल्याकडे असणारा वेळ हि चांगला जाईल आणि आता येणाऱ्या आर्थिक मंदीचाही आपण सामना करू शकू ..
जर तुम्हाला इंटरनेट आणि टेकनॉलॉजि चा वापर उत्तम रित्या करता येत असेल तर घरी बसून तुम्ही Online Classes घेऊ शकता आणि त्यामधून उत्तम पैसे कमाऊ शकता . तुमच्या कडे असणारी कोणतीही कला जी तुम्ही इतरांना शिकवू शकता आणि त्यातून तुम्हाला खूप चांगले अर्थार्जन होऊ शकते. उदाहरण साठी खाली मी काही पर्याय तुम्हाला सुचवत आहे जर तुम्हाला या व्यतिरिक्त एखादी कल्पना सुचली तर कंमेंट मध्ये नक्की सुचवा .. तुमच्या कल्पनेतून कदाचित एखाद्या गृहिणीला खूप चांगली मदत होऊन तिचे हि अर्थार्जन सुरु होईल ..
१) दागिने बनवायला शिकवणे
२) चॉकलेट, केक, ice cream बनवायला शिकवणे
३) शोभेच्या वस्तू बनवायला शिकवणे (विणकाम इ. )
४) इ १ ते १० च्या विद्यार्थ्यांना शिकवणे (यात खूप विषय असतात शिकवण्यासाठी)
५) आरोग्य चांगले राहावे यासाठी चविष्ठ पण आरोग्यास उपयुक्त असे जेवण तयार करण्यास शिकवणे,
६) योगा शिकवणे
७) मराठी , हिंदी , इंग्लिश आणि या व्यतिरिक्त तुमचे अजून एखाद्या भाषेवर प्रभुत्व असेल तर त्या भाषा लोकांना बोलायला शिकवणे सध्या कॉल सेंटर मध्ये ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यामध्ये या ३ भाषांव्यतिरिक्त गुजराती , बंगाली , कन्नड या भाषा येणाऱ्या लोकांना हि खुप प्राधान्य दिले जात आहे तर
speaking skill develop करणे हा हि एक उत्तम पर्याय आहे
८) तुम्हाला जर एखादे वाद्य वाजवता येत असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वाद्य वाजवायला हि शिकवू शकता (ऑनलाईन संगीत क्लासेस )
९) writing skill देखील शिकवू शकता बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये ई-मेल करण्यासाठी काही ठराविक लोकांची नियुक्ती केली जाते तर व्यावहारिक पातळीवर ई-मेल कसे करायचे हे देखील तुम्ही शिकवू शकता ..
१०) उन्हाळी वाळवण तसेच दिवाळीचे फराळ तयार करायला शिकवणे
हे सर्व क्लासेस घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तयार करत बसायची गरज अजिबात नाही , प्ले स्टोर मध्ये बरेच व्यावहारिक व्हिडिओ कॉल साठीचे ऍप्लिकेशन्स आहेत ज्याद्वारे तुम्ही live ५ - १० लोकांना एकत्र शिकवू शकता जर तुम्हाला हे किचकट वाटत असेल तर YouTube तर आहेच कि याच्या मदतीने हि भरपूर लोकांना तुम्ही एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने लाईव्ह शिकवू शकता . तसेच काही learning websites देखील उपलब्ध आहेत जे नेहमी असे वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी शिक्षक शोधत असतात तुम्ही त्यांना हि असं employee म्हणून जोडले जाऊ शकता . आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता ..
हे मला सुचलेले काही पर्याय आहेत शिकवण्या घेण्यासाठी , जर तुम्हाला काही पर्याय माहित असतील तर कंमेंट मध्ये जरूर टाका आपल्या इतर मैत्रिणींना मदत करा ..

Hema yadav ©
Do Not Copy Its Under Copyright ©
Monday, May 11, 2020
"नेटवर्क मार्केटिंग"
नमस्कार ! मित्र मैत्रिणींनो ,
बऱ्याच दिवसांपासून मी नेटवर्क मार्केटिंग या विषयावर अभ्यास करत आहे . कारण मला असे वाटते कि जी यशाची पातळी आपण या क्षेत्रात गाठू शकतो, ती हि अगदी कमी वेळात ती यशाची पातळी आपण नोकरी करून कधीच गाठू शकत नाही . कारण जेव्हा जगातील सर्व श्रीमंत लोकांचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले कि , ” श्रीमंत लोक नेटवर्क उभे करतात ” आणि यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतात” , रॉबर्ट टी कियोसाकी यांचे पुस्तक वाचनात आले , त्यातील काही महत्वाचा भाग तुमच्या सोबत शेअर करत आहे.

” उत्पादनात सामर्थ नसते , सामर्थ असते ते नेटवर्क मध्ये , तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर एक सामर्थ्यवान टिकाव धरून राहू शकणारे आणि वाढत राहणारे नेटवर्क निर्माण करण्यासाठी मार्ग शोधणे हि सर्वात चांगली व्युव्ह रचना आहे ”
“जहाज आणि रेल्वे व्यवसायातील मोठ्या नावांपासून ते सॅम वॉल्टन , बिल गेट्स आणि जेफ बेजोस पर्यंतच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण केली . त्या साठी त्यांनी नेटवर्क कसे उभारायचे हे समजून घेतले , सॅम वॉल्टन यांनी कोणतेही उत्पादन केले नाही , त्यांनी उत्पादित माल विक्री केंद्रापर्यंत पोहचविणारे नेटवर्क उभे केले , बिल गेट्स यांनी संगणक निर्माण केले नाहीत , तर संगणक चालविण्यासाठीची ऑपरेटिंग सिस्टिम उभारली , जेफ बेजोस हे पुस्तक प्रकाशनाकडे वळले नाहीत तर त्यांनी ग्राहकांपर्यंत पुस्तक पोहचविणारे अमेझॉन नावाचे ऑन लाईन नेटवर्क उभे केले . ”
” सवांद हा आयुष्यातल्या प्रत्येक भागावर परिणाम करतो” "चांगली उत्पादने किंवा सेवा देणाऱ्या व्यवसायाकडे पैसे वाहत नाही , पैसे वाहतो तो चांगले नेते असणाऱ्या व्यवसायांकडे ”
हे वाचल्यानंर एक गोष्ट आपल्या सर्वांच्या च लक्षात आली असेल कि , आयुष्यात जर काही भव्य दिव्य करायचे असेल तर आपल्या कडे एक उत्तम नेटवर्क आणि सवांद कौशल्य असणे खूप आवश्यक आहे , आपल्या कडे खूप चांगल्या गोष्टी आहेत पण जर त्याबद्दल आपण कोणाला काही माहिती सांगू नाही शकलो तर कदाचित त्या गोष्टी कधीच कोणाला कळणार नाहीत , आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे कि , ” कि बोलणार्यांची माती पण विकली जाते आणि ना बोलणाऱ्याचे सोने पण कोणी घेत नाही ” हि सर्वाना माहित असणारी गोष्ट आहे पण यावर जर आपण खरंच काम केले तर आपल्या आयुष्यात किती छान बदल घडतील याची कल्पना तर करून पहा !
-हेमा यादव.
Sunday, May 10, 2020
"गुंतवणूक आणि शेअर मार्केट" - लेख क्र. १
आपल्याकडील जवळ जवळ ७०-८०% लोक जेव्हा गुंतवणुकीचा विचार करतात तेव्हा सर्वात आधी गुंतवणुकीचे काही ठराविक पर्याय त्यांच्या समोर येतात उदा . जमीन खरेदी करणे , फ्लॅट्स खरेदी करणे , मग सोने खरेदी करणे , त्यानंतर बँक एफ-डी , पोस्ट इत्यादी.. पण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार सहसा कोणी करतच नाही शेअर मार्केट मध्ये खूप चांगला परतावा मिळण्याची शक्यता असताना सुद्धा आजही लोकांना त्यावर खुपसा विश्वास नाही .. शेअर मार्केट मध्ये धोका आहे का ? असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर त्याचे उत्तर नक्कीच "हो" असेच आहे .. पण हा धोका फक्त त्या लोकांसाठी आहे जे लोक अभ्यास न करता इतरांच्या विश्वसावर पैसे लावण्याचा प्रयत्न करतात. शेअर मार्केट बद्दल अजूनही समाजात बरेचसे अज्ञान असलेले दिसून येते आणि त्यामुळे आपली तरुण पिढी त्याकडे वळताना दिसत नाही रिस्क घेण्याची तयारी कोणामध्ये नाही कारण विश्वास नाही आणि विश्वास का नाही कारण अभ्यास नाही
जगातील किंवा भारतातील कोणतीही श्रीमंत लोकांची यादी पहा प्रत्येक व्यक्ती शेअर मार्केट मध्ये असलेली दिसून येते आणि ते आज-काल पासून नाही तर बऱ्याच वर्षांपासून तिथे असतात .. त्यांच्या इतर व्यवसायांसोबत त्यांची हि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक असते .. आपला स्वतःवर विश्वास नसेल कदाचित पण ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात आणि समाजात स्वकर्तुत्वाने स्वतःचे मोठे अस्तित्व निर्माण केले त्या लोकांवर तर आपण विश्वास ठेऊ शकतो ना ? वॉरेन बफेट , राधाकिशन दमाणी , Porinju Veliyath अशी बरीच उदाहरणे आपल्या समोर आहेत . या लोकांना एकाच दिवसात यश नाही मिळाले.. याची माहिती वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल कि ,कशाप्रकारे संपूर्ण अभयास करून योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे त्यांना यश मिळाले आहे.
शेअर मार्केट मधील गुंतवणूक रिस्की असली तरी योग्य ज्ञान मिळवून जर तुम्ही त्यात प्रवेश केलात तर तुम्ही तुमचे आर्थिक यश खूप लवकर मिळवू शकता , गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शन घेण्याची आणि योग्य अभ्यास करण्याची ..
धन्यवाद - हेमा यादव-कदम
माझ्या या लेखाबद्दल आपले मत जरूर कळवा..
Subscribe to:
Posts (Atom)