आपल्या वस्तूंची जाहिरात गूगल द्वारे करणे म्हणजे क्षणभरात अब्जो लोकांपर्यंत पोहचणे ... खरं तर आपल्याला सध्या जगभरात नाही तर फक्त महाराष्ट्रात च आपला व्यवसाय वाढवायचा आहे ... पण त्यासाठी काय करायचे हा एक प्रश्न असतोच.... याची अनेक उत्तरे आहेत त्यातील एक म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपला व्यवसाय कसा पोहचेल अशी व्यवस्था करणे , थोडक्यात सांगायचे तर तुम्ही जर तुमच्या व्यवसायाची माहिती १० लोकांना दिली तर त्यातून १ व्यक्ती आपली सेवा किंवा वस्तू खरेदी करते याचाच अर्थ तुम्ही सोने विका किंवा माती तुम्हाला मार्केटचा १० टक्के रिस्पॉन्स नक्की मिळणार मग जर तुमची इच्छा असेल कि तुमची वस्तू किंवा सेवा ५०-१०० लोकांनी खरेदी करावी तर त्यासाठी किती लोकांपर्यंत माहिती पोहचायला पाहिजे ते तुम्ही ठरवा.. आता या नवीन लोकांपर्यंत पोहचण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे गूगल वर जाहिरात करणे , गूगल जगभरतील सर्वात मोठे search engine आहे , आपण त्यावर काही हि शब्द टाकले कि त्यासंभंधित आपल्याला गूगल २५-५० लिंक एकाच पानावर दाखवते .. व्यवसायाच्या पब्लिसिटी चा सर्वात चांगला मार्ग आहे गूगल ad-words आणि या जाहिराती करणे हि सोपे आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्यासाठी खालील ६-७ पायऱ्या पूर्ण केल्या कि गुगल वर जाहिराती करता येतात ..
पायरी 1 : Google च्या जाहिराती वेबसाइटवर जा
Https://ads.google.com वर जा. त्यानंतर आपणास दिसेल, ( get started) “आता प्रारंभ करा.” त्यावर क्लिक करा आणि आपल्या Google जाहिराती खात्यासाठी साइन अप करा. त्यानंतर आपण “आपली पहिली मोहीम(Campaign) तयार करा” असे म्हटलेल्या बटणावर क्लिक करू शकता.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पायरी २ : तुमच्या campaign (मोहीम) साठी नाव व प्रकार निवडा
तुमच्या मोहिमेसाठी पर्याय असतील, जेव्हा तुम्ही सुरवात करत असाल (getting started) तेव्हा search network only हा पर्याय सर्वात चांगला.
मोहिमेचे नाव : तुमच्या campaign चे नाव हे तुमच्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या सम्बधीत असावे ज्याची तुम्हाला जाहिरात करावयाची आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पायरी ३ : तुमची जाहिरात प्रकाशित करण्याचे ठिकाण( Ad display location) निवडा
तुमच्याकडे जाहिरात प्रकाशित करण्यासाठी बरेच पर्याय असतात. तुम्ही छोट्या अथवा मोठ्या आकाराचे क्षेत्र निवडू शकता. उदा. एखादे शहर अथवा पूर्ण देश. तसेच तुम्हाला एखादा विशिष्ठ भाग निवडायचा असल्यास तुम्ही त्या भागाचे अक्षांश व रेखांश देखील निवडू शकता.
तुम्हाला तुमच्या आदर्श ग्राहकांच्या ठिकाणाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या स्थानिक व्यवसायाचे मालक असाल तर तुम्ही तुमच्या भागातील ग्राहकांना लक्ष्य करणे अपेक्षित आहे. जर तुम्ही तुमची सेवा अथवा वस्तू या संपूर्ण देशभर पुरविणार असाल तर तुम्ही पूर्ण देश तुमचे Ad location म्हणून निवडू शकता. जे त्यांचा व्यापार हा आंतराराष्ट्रीय पातळीवर करणार असतील त्यांनी ज्या ठिकाणी सर्वाधिक व्यापार होत असेल अथवा जेथे सर्वांत जास्त ग्राहक असतील त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त मोहिमा राबविणे आवश्यक भासू शकते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पायरी ४ : तुमचा दैनिक अर्थसंकल्प(Daily Budget) तयार करा.
जोपर्यंत तुम्ही गुगल ऍड्स वापरण्यात प्रविण होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे बजेट कमीत कमी ठेवणे उत्तम, ज्यायोगे तुम्ही सावधपणे सुरवात करून, माहिती(data) जमा करू शकता आणि त्यानंतर जेथे अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे तेथे तुम्ही विस्तार करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या campaign मध्ये पारंगत व्हाल. लक्षात ठेवा गुगल ऍड्स तुमच्या दैनिक बजेटच्या जास्त जाऊ शकते आणि बऱ्याच वेळेस ते जातेच त्यामुळे तुम्ही तुमच्या मोहिमांवर (campaign) दर आठवड्यात लक्ष्य ठेवणे आवश्यक असते ज्यायोगे तुम्ही तुमच्या बजेटवर दर आठवड्याला आवश्यक ते बदल करून तुमच्या मासिक बजेटच्या जवळपास तुमचा खर्च मर्यादित ठेवू शकता.
तुम्ही तुमचे देयक (payment options) भरण्याचे पर्याय निवडा.
१ स्वतः देयक अदा करा (Manual Payment) :- यात तुम्ही तुमची जाहिरात प्रकाशित होण्याआधी देयक अदा करता.
२ स्वयंचलित पद्धतीने देयक अदा करा (Automatic Payment) :- यात तुम्ही तुमचे गुगल ऍड्सचे खाते तुमच्या बँकेच्या खात्यास अथवा क्रेडिट कार्ड ला लिंक करता व तुमच्या खात्यातून जाहिरातीचे देयक अदा केले जाते.
३ महिन्याचे देयक अदा करा (Monthly Invoice) :- हा पर्याय गुगल काही व्यावसायिकांना उपलब्ध करून देते जे त्यांच्या अटी व शर्तीमध्ये पात्र असतात. यात गुगल तुम्हाला महिन्याचे बिल एकत्र भरण्याची मुभा देते, तुम्हाला दर जाहिरातीसाठी पैसे भरणे गरजेचे नसते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पायरी ५ : कीवर्ड तयार करा
पहिल्यांदा जाहिरात देणाऱ्यांसाठी हे थोडी अवघड गोष्ट ठरू शकते. यात तुमचा कल हा तुमच्या व्यवसायाबद्दल जास्तीत जास्त माहिती देणारे कीवर्डस जमा करण्याकडे असू शकतो. आणि प्रत्यक्षात गुगलही तुमच्याकडून हीच अपेक्षा करते ज्यायोगे तुम्ही जास्तीत जास्त पैसे खर्च करता.
पण हा मोह टाळा आणि अशा शब्दांकडे लक्ष्य द्या जे कमीत कमी शब्दांत जास्त माहिती देतात. हे असे शब्द असतात की ज्यात कुठलाही संशय उरत नाही की जेव्हा एखादी व्यक्ती जे काही शोधत आहे ते तुम्हीच पुरवीत आहात आणि असे शब्द मोजकेच असतात. त्यामळे असे शब्द सुचवू नका की ज्यायोगे तुम्ही पुरवीत असलेली सेवा अथवा वस्तू आणि तुम्ही सुचविलेले शब्द यामुळे काही शंका उदभवू शकते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पायरी ६ : जाहिरात तयार करा
येथून पुढे खरे काम सुरु होते. आपल्याला अशी जाहिरात तयार करायची असते जी आपल्या ग्राहकांना आकर्षित करेल आणि आपल्या वेबसाईटवर जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करेल. गुगलच्या सर्च बारमध्ये त्यांनी वापरलेल्या कीवर्ड असलेल्या जाहिरातींवर क्लिक करण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच आपण आपले ग्राहक वापरत असलेल्या कीवर्ड्स असलेल्या वाक्यांचे (कीवर्ड संशोधनानंतर) लक्ष्य करत असल्यास तुमच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मथळ्यात(Headline) ते कीवर्ड अथवा वाक्यांश असतील याची खात्री करा.
जाहिरातीच्या मथळ्यानंतर तुम्ही मसुद्याकडे वळू शकता. यात तुम्ही तुमच्या सेवा अथवा उत्पादनांच्या मुख्य फायद्यांकडे लक्ष्य केंद्रित करा. जर काही खास सवलत असेल तर तिचे वर्णन करा आणि नंतर तुमच्या उत्पादनासाठी पुन्हा एकदा आकर्षित करा.
शेवटी तुम्ही ग्राहकांना तुमच्या लैंडिंग पेजवर पाठवता जे तुमच्या जाहिरातीशी मिलते-जुलते असते. यावरून तुम्ही सुनिश्चित करू शकता की जाहिरातील माहिती landing page वर प्रतिबिंबीत झालेली आहे, ज्यामुळे चांगले रूपांतर होईल. बऱ्याचदा लोक अशी चूक करतात की जाहिरात सेट करताना विशेष सवलतीचा उल्लेख करतता परन्तु जाहिरात बघून home page वर गेल्यावर त्या सवलतीचा कोणताही उल्लेख नसतो. यामुळे आपल्या पड़री केवळ निराशा येते. तुम्ही वापरलेले कीवर्ड्स आणि वाक्यांश यांचा तुमच्या landing page वर प्रकर्षाने उल्लेख हवा.
शेवटी तुम्ही ग्राहकांना तुमच्या लैंडिंग पेजवर पाठवता जे तुमच्या जाहिरातीशी मिलते-जुलते असते. यावरून तुम्ही सुनिश्चित करू शकता की जाहिरातील माहिती landing page वर प्रतिबिंबीत झालेली आहे, ज्यामुळे चांगले रूपांतर होईल. बऱ्याचदा लोक अशी चूक करतात की जाहिरात सेट करताना विशेष सवलतीचा उल्लेख करतता परन्तु जाहिरात बघून home page वर गेल्यावर त्या सवलतीचा कोणताही उल्लेख नसतो. यामुळे आपल्या पड़री केवळ निराशा येते. तुम्ही वापरलेले कीवर्ड्स आणि वाक्यांश यांचा तुमच्या landing page वर प्रकर्षाने उल्लेख हवा.
पायरी ७: कन्वरशन ट्रॅकिंग सेट करा
शेवटची पायरी म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी योग्य अशा कन्वरशन ट्रॅकिंग सेट करणे, यासाठी गुगल तुम्हाला खालीलप्रमाणे पर्याय देते.
आपण जाहिराती चालू करण्यापूर्वी सर्व कन्वरशन ट्रॅकिंग सेट केले असल्याची खात्री करुन घ्या. अन्यथा, आपल्या जाहिरातींचा प्रभाविपणा आपण मोजू शकणार नाही.
शेवटची पायरी म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी योग्य अशा कन्वरशन ट्रॅकिंग सेट करणे, यासाठी गुगल तुम्हाला खालीलप्रमाणे पर्याय देते.
- Webform leads (उदा. दरपत्रक मागणी [Quote request ]
- ई-कॉमर्स ऑर्डर्स (उदा. तुमच्या शॉपिंग पोर्टल वरून आलेल्या ऑर्डर्स)
- कॉल्स फ्रॉम ads (उदा. जाहिरातीत प्रकाशित केलेल्या फोन नंबर वरुन आलेले फोन.)
- वेबसाईटवरून आलेले कॉल्स (उदा. वेबसाईटवर उल्लेखलेल्या नंबर वरुन आलेले फ़ोन.)
- इंटरनेटवरील विक्रीतून होणारी आयात.
आपण जाहिराती चालू करण्यापूर्वी सर्व कन्वरशन ट्रॅकिंग सेट केले असल्याची खात्री करुन घ्या. अन्यथा, आपल्या जाहिरातींचा प्रभाविपणा आपण मोजू शकणार नाही.
मोहिमांचा प्रभावी मागोवा घेणे, समायोजित करणे आणि यशस्वी होणे (Tracking, Adjusting, & Conquering effective campaign )
आपली जाहिरात चालू असताना तिच्या परिमाणांचे विश्लेषण करत रहा. त्यातून आपल्याला काय चांगल्या प्रकारे सुरु आहे आणि कशात सुधारणेस वाव आहे हे समजण्यास मदत होईल. आपण आपल्या जाहिरातींकडे बारकाईने लक्ष्य दिल्यास, तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या सर्वोत्तम परिणाम मिळण्यास नक्कीच मदत होईल.
आपले ग्राहक हे कोणत्या जाहिरातींसाठी सर्वात जास्त क्लिक करतात हे समजल्यावर आपण त्याप्रकारच्या जाहिराती जास्त प्रमाणात करू शकतो. यामुळे तुमचा कॉस्ट पर क्लिक कीवर्डस जास्त होउन तुमच्या गुंतवणुकीवरील परतावा वाढतो (R.O.I. - Returns on Investment)
आता तुम्ही सुरवात करू शकता आणि एकदा तुम्ही यात उडी घेतली की तुम्ही अधिकाधिक शिकत जाल आणि तुम्हाला कळेल की गुगल ऍड्स हा तुमचा व्यवसाय वाढीसाठी हा चांगला पर्याय आहे.
हे आर्टिकल इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे . ते आपल्या सर्वांसाठी मी मराठीत भाषांतरित केले आहे .

No comments:
Post a Comment