Saturday, May 23, 2020

" योग प्रशिक्षक " Yoga Trainer

आपल्याकडे बऱ्याच अशा महिला आहेत ज्या योग्य वयात स्वतःच्या तब्ब्येतीकडे लक्ष देत नाहीत मग एका ठराविक वयानंतर त्यांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो .. काही शारीरिक आजार तर व्यायामाणेच बरे होतात .. त्यामुळे योग हा एक अविभाज्य भाग आहे ... बऱ्याच गृहिणी आपल्या आजूबाजूला कोणी महिला योगा प्रशिक्षक नाही म्हणून हि योगा शिकण्यासाठी जात नाही आणि हा खूप मोठा वर्ग आहे .. जर तुम्ही स्वतः योग प्रशिक्षक बनलात तर यात खूप चांगल्या संधी उपलब्ध होतील शिवाय योगा एका ठराविक वेळेत शिकवता येतो त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवस व्यस्त राहण्याची गरज नाही .. तुम्हाला स्वतःला काही हि योग प्रशिक्षक बनण्यासाठी प्रशिक्षण घेता येते .. यासाठी वयाची अट नाही .. गूगल वर तुम्हाला तुमच्या घराजवळील योग प्रशिक्षक होण्यासाठी चे ट्रेनिंग सेंटर मिळतील .. सर्टिफिकेट कोर्से करता येतील .. या क्षेत्रातील संधी कालानुरूप वाढत च जाणार आहे .. महिलांनीच  जर महिलांना त्याच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यास योग्य वयात प्रवृत्त केले तर कदाचित आपल्या महिलांना वृद्धत्वात होणारे त्रास हि कमी होतील .. प्रत्येक घरातील स्त्रीच्या हातात एका पूर्ण कुटुंबाचे आरोग्य असते त्यामुळे त्यांना योग आणि व्यायाम या दोन्हीचे महत्व असायला पाहिजे नाही का ? ☺☻

No comments:

Post a Comment