गुंतवणूक करताना नेहमी आपली गरज पाहून आपण गुंतवणूक करायची. ती किमान ४-५ वेग-वेगळ्या प्रकारात असावी जेणेकरून गरज असेल तेव्हा कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये :
व्यवसाय आणि गुंतवणूक हे दोन विषय येणाऱ्या काळात आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावणार आहेत . फक्त नोकरी वर अवलंबून ना राहता इतर मार्गांचा हि आपण विचार करायला पाहिजे "कमीतकमी गुंतवणूक आणि जास्तीत जास्त फायदा" हा एकच हेतू नजरेसमोर ठेऊन हा ब्लॉग सुरु करत आहे आपल्या प्रतिक्रिया आणि प्रश्न नक्की कळवा yhem100@gmail.com
Monday, October 23, 2023
"आर्थिक तडजोड / संघर्ष करणे म्हणजेच आयुष्य जगणे नसते"
Monday, July 24, 2023
VADHU VAR PASANTI MATRIMONY SERVICES
नमस्कार ,
हा क्रमांक श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ (वाई-पुणे) तर्फे चालविण्यात येणाऱ्या वधु - वर पसंती संस्थेचा आहे. विवाह जमविण्यासाठी आपल्याला अधिका-धिक स्थळाची आवश्यकता असते., पण एक किंवा दोन ठिकाणी नाव नोंदणी करून लगेच मनासारखे स्थळ मिळेल याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे अधिकाधिक ठिकाणी आपली नोंदणी असणे आवश्यक असते. कारण कुठूनही कधीही गोष्टी पटकन जुळून येऊ शकतात. विवाह जमविण्यासाठी तुमचे जे काही प्रयत्न आता सुरु आहेत त्यात आमची संस्था हि एक उत्तम मार्ग असू शकेल ,
कारण :
1) अत्यंत कमी सेवा शुल्क :
वार्षिक नोंदणी रु १२००/- फक्त
आणि विवाह जमेपर्यंत रु १५००/- रु फक्त
2) विवाहाच्या दृष्टीने पत्रिका देखील पहिली जाते.
विवाह योग- ५०१/- (विवाहपूर्व विषयासंबंधी सर्व प्रश्न)
करिअर योग - ५०१/- (यश , प्रगती यासंबंधी सर्व प्रश्न)
आर्थिक , कौटुंबिक किंवा इतर प्रश्न १००१ /-
3) जर निर्णय घेण्यात गोंधळ होत असेल तर समुपदेशन सेवा देखील उपलब्ध आहे
विवाहपूर्व समुपदेशन : १०००/-रु
विवाह पश्चात समुपदेशन : १०००/- रु
4) काही स्थळांसोबत जर आम्ही बोलण्याची आवश्यकता असेल तर तसेही कळवू शकता आम्ही स्वतः त्या ठराविक स्थळांसोबत तुमच्यासाठी संपर्क करू . (मध्यस्ती सेवा / मीटिंग सर्विस)
5) तुम्हाला वृत्तपत्रात जाहिरात द्यायची असेल तर ती हि आपल्या संस्थेतर्फे तुम्हाला देता येईल , स्थळाची योग्य पद्धतीने चौकशी करून मगच स्थळ तुम्हाला पुढे पाठवले जाईल आमच्या चौकशीच्या पद्धतीमुळे कदाचित फसवणुक टाळता येऊ शकते.
6) तसेच विविध वैयक्तिक सेवा (Personalized Service) देखील उपलब्ध आहेत . यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन घ्यावे लागेल.
विवाह जमेपर्यंत प्रयत्न करत राहणे हे आपले काम आहे ., पुणे - मुंबई सारख्या ठिकाणी आपण राहत आहोत जिथे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे., म्हणजे शोध कार्य देखील त्या पटीने व्हायला हवे , अशा वेळी फक्त १ आणि २ ठिकाणी नाव नोंदणी असून उपयोग आहे का ? याचा विचार तुम्हीच करा , जितक्या लवकर विवाह जमून यावा असे वाटत असेल तितके जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. वेळ वाया न घालवता लगेच च नोंदणी करा आणि शोधकार्याचा वेग वाढवा.
GOOGLE PAY / PHONE PAY NUMBER : 9766271744
Bank Details :
Name : Hemlata Suresh Yadav
Bank Name : ICICI BANK
Account Number : 624001572309
IFSC Code : ICIC0006240
Location : Pune
( वरील सर्व सेवा फक्त ब्राह्मण , मराठा तसेच आंतरजातीय चालेल अशा सर्व जातीय प्रथम वधु - वर यासाठी आहे ).
धन्यवाद
हेमा यादव-कदम
नवी पेठ पुणे ३०
९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९
https://www.vadhuvarpasanti.in
Friday, June 23, 2023
आर्थिक सुरक्षितता हि नुसते पैसे कमावल्याने नाही तर कमावलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्याने साध्य होते
सुप्रभात.
Friday, April 7, 2023
"वस्तू महत्त्वाची की व्यक्ती ?" इन्शुरन्स नक्की कोणाचा काढायला हवा. ?
"वस्तू महत्त्वाची की व्यक्ती ?" इन्शुरन्स नक्की कोणाचा काढायला हवा. ?
Sunday, July 26, 2020
"आपल्या व्यवसायाचं पुढे काय होणार? " - (एक मुलाखत)
Thursday, July 23, 2020
sell on amazon (amazon वर विक्री)
Amazon कंपनी सध्या घरपोच सामान पोहचवणारी सर्वात मोठी कंपनी आहे जर या कंपनी सोबत तुम्हाला काम करायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा स्वतःचे seller account सुरु करा तुमची वस्तू ग्राहकांनी खरेदी केली कि , amazon कंपनी ७ - १५ दिवसात पैसे तुमच्या खात्यात जमा करते हा सर्वात मोठा पर्याय आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा ... हा हि एक प्रयत्न करून पहा ....
https://services.amazon.in/services/sell-on-amazon/how-it-works.html
गूगल जाहिरात (google ad words) lecture number 5
आपल्या वस्तूंची जाहिरात गूगल द्वारे करणे म्हणजे क्षणभरात अब्जो लोकांपर्यंत पोहचणे ... खरं तर आपल्याला सध्या जगभरात नाही तर फक्त महाराष्ट्रात च आपला व्यवसाय वाढवायचा आहे ... पण त्यासाठी काय करायचे हा एक प्रश्न असतोच.... याची अनेक उत्तरे आहेत त्यातील एक म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपला व्यवसाय कसा पोहचेल अशी व्यवस्था करणे , थोडक्यात सांगायचे तर तुम्ही जर तुमच्या व्यवसायाची माहिती १० लोकांना दिली तर त्यातून १ व्यक्ती आपली सेवा किंवा वस्तू खरेदी करते याचाच अर्थ तुम्ही सोने विका किंवा माती तुम्हाला मार्केटचा १० टक्के रिस्पॉन्स नक्की मिळणार मग जर तुमची इच्छा असेल कि तुमची वस्तू किंवा सेवा ५०-१०० लोकांनी खरेदी करावी तर त्यासाठी किती लोकांपर्यंत माहिती पोहचायला पाहिजे ते तुम्ही ठरवा.. आता या नवीन लोकांपर्यंत पोहचण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे गूगल वर जाहिरात करणे , गूगल जगभरतील सर्वात मोठे search engine आहे , आपण त्यावर काही हि शब्द टाकले कि त्यासंभंधित आपल्याला गूगल २५-५० लिंक एकाच पानावर दाखवते .. व्यवसायाच्या पब्लिसिटी चा सर्वात चांगला मार्ग आहे गूगल ad-words आणि या जाहिराती करणे हि सोपे आहे.
पायरी ३ : तुमची जाहिरात प्रकाशित करण्याचे ठिकाण( Ad display location) निवडा
पायरी ४ : तुमचा दैनिक अर्थसंकल्प(Daily Budget) तयार करा.
पायरी ५ : कीवर्ड तयार करा
शेवटी तुम्ही ग्राहकांना तुमच्या लैंडिंग पेजवर पाठवता जे तुमच्या जाहिरातीशी मिलते-जुलते असते. यावरून तुम्ही सुनिश्चित करू शकता की जाहिरातील माहिती landing page वर प्रतिबिंबीत झालेली आहे, ज्यामुळे चांगले रूपांतर होईल. बऱ्याचदा लोक अशी चूक करतात की जाहिरात सेट करताना विशेष सवलतीचा उल्लेख करतता परन्तु जाहिरात बघून home page वर गेल्यावर त्या सवलतीचा कोणताही उल्लेख नसतो. यामुळे आपल्या पड़री केवळ निराशा येते. तुम्ही वापरलेले कीवर्ड्स आणि वाक्यांश यांचा तुमच्या landing page वर प्रकर्षाने उल्लेख हवा.
शेवटची पायरी म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी योग्य अशा कन्वरशन ट्रॅकिंग सेट करणे, यासाठी गुगल तुम्हाला खालीलप्रमाणे पर्याय देते.
- Webform leads (उदा. दरपत्रक मागणी [Quote request ]
- ई-कॉमर्स ऑर्डर्स (उदा. तुमच्या शॉपिंग पोर्टल वरून आलेल्या ऑर्डर्स)
- कॉल्स फ्रॉम ads (उदा. जाहिरातीत प्रकाशित केलेल्या फोन नंबर वरुन आलेले फोन.)
- वेबसाईटवरून आलेले कॉल्स (उदा. वेबसाईटवर उल्लेखलेल्या नंबर वरुन आलेले फ़ोन.)
- इंटरनेटवरील विक्रीतून होणारी आयात.
आपण जाहिराती चालू करण्यापूर्वी सर्व कन्वरशन ट्रॅकिंग सेट केले असल्याची खात्री करुन घ्या. अन्यथा, आपल्या जाहिरातींचा प्रभाविपणा आपण मोजू शकणार नाही.
हे आर्टिकल इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे . ते आपल्या सर्वांसाठी मी मराठीत भाषांतरित केले आहे .
Friday, July 17, 2020
" YouTube वर व्हिडिओ कसा अपलोड करायचा " (lecture 4)
सर्वात आधी मोबाईल चा वापर करून छान व्हिडीओ तयार करा. व्हिडीओ जर लहान असेल तर उत्तम .. कमी वेळात जर तुम्ही महत्वाची माहिती दिलीत तर जास्तीत जास्त लोक तुमच्या चॅनेल ला जॉईन होत जातात थोडक्यात व्हिडीओ कंटाळवाणे असू नये .
आपल्या यूट्यूब खात्यात (अकाउंट मध्ये) लॉग इन करा. (दुसऱ्या लेक्टर मध्ये आपण पाहिले कि चॅनेल कसा तयार करायचा ) त्यांनतर तुमच्या चॅनेल चे नाव तुम्हाला उजव्या कोपऱ्यात दिसेल त्यावर क्लिक करा मग तुम्हाला YouTube Studio असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .
YouTube Studio हा पर्याय निवडल्यानंतर खालील प्रमाणे स्क्रीन ओपन होईल.
आता ३ री पायरी म्हणजे "अपलोड" बटणावर क्लिक करा (लाल चौकोनात पहा)
अपलोड बटण पानाच्या उजव्या बाजूला आहे . त्यावर क्लिक केले कि पुढील स्क्रीन दिसेल
आता select file या बटन वर क्लिक करून जो व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे तो निवडा
व्हिडिओ अपलोड झाल्यावर योग्य ती माहिती भरा म्हणजे लोकांना तुमचा व्हिडिओ शोधणे सोपे जाईल .
या स्क्रीन वर तुम्हाला तुमचा अपलोड झालेला व्हिडीओ उजव्या बाजूला दिसेल आणि डाव्या बाजूला you tube तुम्हाला काही माहिती विचारते ,
a Description : यात तुमच्या व्हिडीओ बद्दल थोडक्यात माहिती लिहायची
b Tags : म्हणजे तुमच्या व्हिडीओ संधर्भात असे काही शब्द टाकायचे कि लोकांना शोधणे सोपे होईल उदा , जर तुम्ही थालीपीठ चा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही (बेसन चे पदार्थ , थालीपीठ , इ .. ) असे शब्द टाकू शकता
c . audience : म्हणजे लहान मुलांनी पहिले तर चालेल का ? कारण काही व्हिडीओ लहान मुलांसाठी नसतात म्हणून हा पर्याय youtube आपल्याला देते .
सर्व माहिती भरून झाली कि उजव्या बाजूला खाली next असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर
Video elements नावाचे पण उघडेल तिथे हि next बटन वर क्लिक करा.
या ठिकाणी तुम्हाला public हा पर्याय निवडायचा आहे आणि शेवटी save या बटन वर क्लिक करायचे आहे .
मग तुमचा व्हिडिओ अपलोड होऊन तुमच्या व्हिडिओ ची लिंक तयार होईल इच्छा असल्यास हि लिंक तुम्ही कोणत्याही social network वर टाकू शकता म्हणजे व्हाट्सअँप ./ इंस्टाग्राम / फेसबुक इ इ ...YouTube मध्ये हि तुम्ही privacy setting द्वारे लोकांकडून येणाऱ्या कंमेंट hide करू शकता , तुम्ही approve केल्याशिवाय कमेंट दिसणार नाही असे हि करू शकता ..
आता पुढल्या लेक्टर मध्ये आपण YouTube मधील privacy setting शिकूया
तसेच त्यापुढील आपले LECTURE असेल कि गूगल पे द्वारे ऑनलाईन पेयमेन्ट कसे करायचे
तुम्हाला या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टींची माहिती हवी असेल तर नक्की विचारा ,






