नमस्कार ! मित्र मैत्रिणींनो ,
बऱ्याच दिवसांपासून मी नेटवर्क मार्केटिंग या विषयावर अभ्यास करत आहे . कारण मला असे वाटते कि जी यशाची पातळी आपण या क्षेत्रात गाठू शकतो, ती हि अगदी कमी वेळात ती यशाची पातळी आपण नोकरी करून कधीच गाठू शकत नाही . कारण जेव्हा जगातील सर्व श्रीमंत लोकांचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले कि , ” श्रीमंत लोक नेटवर्क उभे करतात ” आणि यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतात” , रॉबर्ट टी कियोसाकी यांचे पुस्तक वाचनात आले , त्यातील काही महत्वाचा भाग तुमच्या सोबत शेअर करत आहे.

” उत्पादनात सामर्थ नसते , सामर्थ असते ते नेटवर्क मध्ये , तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर एक सामर्थ्यवान टिकाव धरून राहू शकणारे आणि वाढत राहणारे नेटवर्क निर्माण करण्यासाठी मार्ग शोधणे हि सर्वात चांगली व्युव्ह रचना आहे ”
“जहाज आणि रेल्वे व्यवसायातील मोठ्या नावांपासून ते सॅम वॉल्टन , बिल गेट्स आणि जेफ बेजोस पर्यंतच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण केली . त्या साठी त्यांनी नेटवर्क कसे उभारायचे हे समजून घेतले , सॅम वॉल्टन यांनी कोणतेही उत्पादन केले नाही , त्यांनी उत्पादित माल विक्री केंद्रापर्यंत पोहचविणारे नेटवर्क उभे केले , बिल गेट्स यांनी संगणक निर्माण केले नाहीत , तर संगणक चालविण्यासाठीची ऑपरेटिंग सिस्टिम उभारली , जेफ बेजोस हे पुस्तक प्रकाशनाकडे वळले नाहीत तर त्यांनी ग्राहकांपर्यंत पुस्तक पोहचविणारे अमेझॉन नावाचे ऑन लाईन नेटवर्क उभे केले . ”
” सवांद हा आयुष्यातल्या प्रत्येक भागावर परिणाम करतो” "चांगली उत्पादने किंवा सेवा देणाऱ्या व्यवसायाकडे पैसे वाहत नाही , पैसे वाहतो तो चांगले नेते असणाऱ्या व्यवसायांकडे ”
हे वाचल्यानंर एक गोष्ट आपल्या सर्वांच्या च लक्षात आली असेल कि , आयुष्यात जर काही भव्य दिव्य करायचे असेल तर आपल्या कडे एक उत्तम नेटवर्क आणि सवांद कौशल्य असणे खूप आवश्यक आहे , आपल्या कडे खूप चांगल्या गोष्टी आहेत पण जर त्याबद्दल आपण कोणाला काही माहिती सांगू नाही शकलो तर कदाचित त्या गोष्टी कधीच कोणाला कळणार नाहीत , आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे कि , ” कि बोलणार्यांची माती पण विकली जाते आणि ना बोलणाऱ्याचे सोने पण कोणी घेत नाही ” हि सर्वाना माहित असणारी गोष्ट आहे पण यावर जर आपण खरंच काम केले तर आपल्या आयुष्यात किती छान बदल घडतील याची कल्पना तर करून पहा !
-हेमा यादव.
ही ब्लाॅगची कल्पना खुप छान आहे. मात्र त्याचा प्रसार करणे तेही महत्वाचे आहे. All the best!!
ReplyDelete