Thursday, May 14, 2020

ऑनलाईन शिकवण्या (classes)

जर आपण पुढील १ ते २ वर्षांचा विचार केला कोरोना सारख्या आजारामुळे घरातील सर्वानीच बाहेर जाऊन नोकऱ्या करणे शक्य नाही कमीत कमी या आजारावर औषध मिळे पर्यंत तरी .. त्यामुळे या ब्लॉग द्वारे महिलांना  घरातून काही काम करता येण्यासारखे आहे का ? या बद्दल माहिती घेणार आहोत , ज्यामुळे आपल्याकडे असणारा वेळ हि चांगला जाईल आणि आता येणाऱ्या आर्थिक मंदीचाही आपण सामना करू शकू ..

 जर तुम्हाला इंटरनेट आणि टेकनॉलॉजि चा वापर उत्तम रित्या करता येत असेल तर घरी बसून तुम्ही Online Classes घेऊ शकता आणि त्यामधून उत्तम पैसे कमाऊ शकता . तुमच्या कडे असणारी कोणतीही कला जी तुम्ही इतरांना शिकवू शकता आणि त्यातून तुम्हाला खूप चांगले अर्थार्जन होऊ शकते. उदाहरण साठी खाली मी काही पर्याय तुम्हाला सुचवत आहे जर तुम्हाला या व्यतिरिक्त एखादी कल्पना सुचली तर कंमेंट मध्ये नक्की सुचवा .. तुमच्या कल्पनेतून कदाचित एखाद्या गृहिणीला खूप चांगली मदत होऊन तिचे हि अर्थार्जन सुरु होईल ..

१) दागिने बनवायला शिकवणे
२) चॉकलेट, केक, ice cream बनवायला शिकवणे
३) शोभेच्या वस्तू बनवायला शिकवणे (विणकाम इ. )
४) इ १ ते १० च्या  विद्यार्थ्यांना शिकवणे (यात खूप विषय असतात शिकवण्यासाठी)
५) आरोग्य चांगले राहावे यासाठी चविष्ठ पण आरोग्यास उपयुक्त असे जेवण तयार करण्यास शिकवणे,
६) योगा शिकवणे
७) मराठी , हिंदी , इंग्लिश आणि या व्यतिरिक्त तुमचे अजून एखाद्या भाषेवर प्रभुत्व असेल तर त्या भाषा लोकांना बोलायला शिकवणे सध्या कॉल सेंटर मध्ये ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यामध्ये या ३ भाषांव्यतिरिक्त गुजराती , बंगाली , कन्नड या भाषा येणाऱ्या लोकांना हि खुप प्राधान्य दिले जात आहे तर
speaking skill develop करणे हा हि एक उत्तम पर्याय आहे
८) तुम्हाला जर एखादे वाद्य वाजवता येत असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वाद्य वाजवायला हि शिकवू शकता (ऑनलाईन संगीत क्लासेस )
 ९) writing skill देखील शिकवू शकता बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये ई-मेल करण्यासाठी काही ठराविक लोकांची नियुक्ती केली जाते तर व्यावहारिक पातळीवर ई-मेल कसे करायचे हे देखील तुम्ही शिकवू शकता ..
१०) उन्हाळी वाळवण तसेच दिवाळीचे फराळ तयार करायला शिकवणे


हे सर्व क्लासेस घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तयार करत बसायची गरज अजिबात नाही , प्ले स्टोर मध्ये बरेच व्यावहारिक व्हिडिओ कॉल साठीचे ऍप्लिकेशन्स आहेत ज्याद्वारे तुम्ही live ५ - १० लोकांना एकत्र शिकवू शकता जर तुम्हाला हे किचकट वाटत असेल तर YouTube तर आहेच कि याच्या मदतीने हि भरपूर लोकांना तुम्ही एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने लाईव्ह शिकवू शकता .  तसेच काही learning websites देखील उपलब्ध आहेत जे नेहमी असे वेगवेगळे  विषय शिकवण्यासाठी शिक्षक शोधत असतात तुम्ही त्यांना हि असं employee म्हणून जोडले जाऊ शकता . आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता ..

हे मला सुचलेले काही पर्याय आहेत शिकवण्या घेण्यासाठी , जर तुम्हाला काही पर्याय माहित असतील तर कंमेंट मध्ये जरूर टाका आपल्या इतर मैत्रिणींना मदत करा ..


Hema yadav  ©

Do Not Copy Its Under Copyright ©

3 comments:

  1. Cooking class,computer class ही youtube माध्यमातून घेऊ शकता

    ReplyDelete
  2. Share market che clases from basic level
    English speaking from A B C D to industrial language

    ReplyDelete