Thursday, July 16, 2020

" सेल (विक्री) वाढवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स " (lecture 3)


ऑनलाईन मार्केटिंग शिकल्यानंतर खूप जास्त ग्राहकांपर्यंत कसे पोहचायचे हे कळेल पण त्यापुढे प्रश्न उभा राहतो तो विक्रीचा आपण जी सेवा किंवा वस्तू विकणार आहोत .  ती जास्तीत जास्त लोकांनी खरेदी करावी या साठी काही महत्वाच्या टिप्स .. आपल्या कडे फक्त कला असून चालत नाही तर ती कला योग्य पध्दतीने सादर करता यायला पाहिजे ..  


·         आपले मिशन (उद्देश) / आणि व्हिजन स्पष्ट असावे
जो व्यवसाय आपण सुरु करणार आहेत त्या व्यवसायातील बारकावे सर्व प्रथम समजून घ्या ,

·         आपण इतरांपेक्षा सर्वोत्तम का आहोत ?
·         तुम्ही जे काम करत आहेत त्याची जास्त गरज कोणाला आहे ?
·         तुमच्या कामातील स्वर्वोत्तम शक्यता काय आहेत ?
·         तुमचा ग्राहक तुमच्याकडे किती पैसे भरू शकतो ?

जर वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज पाने मिळत नसतील तर तुम्हाला तुमच्या कामात अधिक स्पष्टता आणण्यासाठी आणि तुमचे ध्येय गाठण्यासाठी एखादी मोहीम राबवणे आवश्यक राहील .

  •     आपले ध्येय किंवा मिशन विशिष्ट विभागात विभागून घ्या !

  •  रोजच्या कामाचा आराखडा लिहून काढा ( दररोज किती कॉल करणार , किती प्रोपोसल दर महिना सेल करणार बिलिंग किती करणार .) या सर्व गोष्टी आपल्या हातात असणार आहेत .
  • तुम्हाला अपेक्षित असणारा निकाल तुम्ही लिहून काढा (दर महिना किती सेल झाले , प्रत्येक बिल ची अमाऊंट काय होती , प्रत्येक सेल नंतर झालेला तुमचा प्रॉफिट किती झाला ? )


तुमची प्रगती झपाट्याने होण्यासाठी वरील दोन गोष्टींचा लक्ष पूर्वक सातत्याने अभ्यास करा आणि गरज असेल ते सर्व बदल करा तुमच्या कामाचा वेग वाढवा , जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्ही उत्साही पणे  तुमचे काम यशस्वी रित्या पूर्ण करू शकाल

·         ग्राहकाची गरज ओळखायला शिका

·         ग्राहक नेहमी तेच खरेदी करतात ज्या गोष्टींची त्यांना "खूप गरज" असते ?
·         त्यांची गरज लक्षात घेऊन तुम्ही त्यांना कसे समजाऊ शकता ?
·         जर ग्राहकाला तुमच्या सेवा त्याच्या साठी योग्य वाटल्या तर ते पैसे खर्च करतात त्यामुळे तुम्ही तुमच्या सेवांच्या वैशिष्ट्यांवर भर द्या .
·         तुमच्या सेवांमध्ये गरजेनुसार आवश्यक ते बदल करा

·         ग्राहकाचे लक्ष वेधून घ्या आणि ते टिकवून  ठेवायला शिका
1.    उत्कृष्ट जाहिरातबाजी
2.    संदर्भ
3.    उत्कृष्ट विक्री कौशल्य
4.    आणि धोरणात्मक म्हणजेच (योग्य प्रश्न विचारण्याचे कौशल्य )
या महत्वाच्या गोष्टी जर आपल्या संवादात असतील तर आपण ग्राहकाचे लक्ष आपल्याकडे टिकून ठेऊ शकतो ,

·         विक्री करण्याआधी हेतू स्पष्ट असायला पाहिजे
आपण जे काम करत आहेत ते करताना गोष्टी नेहमी लक्षात असुद्या कि आपण ) काय करत आहेत आणि ) का करत आहेत
1.    तुम्ही ग्राहक म्हणून कोणाला लक्ष (टार्गेट ) करत आहेत आणि का?
2.    आपण त्यांना काय सांगणार आणि का?
3.    आपण त्यांना काय विचारणार आणि का?
4.    आपला प्रस्ताव काय असेल  आणि का?
5.    आपण ऑर्डरची मागणी कधी करणार आहात?
विक्री करताना प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला स्वत: ला खात्री नसेल किंवा वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आत्मविश्वासाने देता येत नसतील तर समजून घ्या कि तुम्हाला प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन घेण्याची गरज आहे

·         विचारा, ऐका आणि कृती करा
या तीन गोष्टी सेल्स मध्ये खूप महत्वाच्या असतात
आपण जे प्रश्न विचारणार आहेत ते विषयाशी संबंधित , थेट , नियोजनबद्ध आणि ग्राहकाला विचार करण्यास प्रवृत्त करतील असे असावेत
तुमची ऐकण्याची क्षमता बऱ्यापैकी विकसित असणे महत्वाचे असते , जर आपण ग्राहकाची समस्या लक्ष पूर्वक एऐकू शकलात तर आणि तरच तुम्ही त्याला योग्य सेवा सुचवू शकता.
सेवा सुचवल्यानंतर त्यांना ती घेण्याची किती गरज आहे हे पटवून द्या आणि लगेचच सेल करून घ्या


·         जबाबदारी घ्या पण श्रेय घेऊ नका
जर आपण एखाद्या ग्रुप चे नेते असाल तर एक खूप चांगला संघ बनवणे हे तुमच्या हातात असते कंपनी तुमच्या सर्व कामांसाठी तुम्हाला योग्य ते सहकार्य करते तुमच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत देखील करते , तुम्ही दाखवलेल्या दिशेने तुमचा संघ आणि कंपनी मार्गक्रमण करत असते त्यामुळे तुम्ही जबाबदारी घेणे आवश्यक असते काम चांगले झाले तर सर्वाना त्याचे श्रेय द्या पण जर त्यात काही चुकले तर मोठेपणाने त्याची जबादारी घ्या


·         मूलभूत गोष्टींवर कार्य करा.
स्वतः मध्ये सुधारणा करण्याची गरज सर्वोत्तम व्यक्तीला देखील असते ,तुमच्यामधील काही कमतरता शोधून त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घ्या, आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत पण त्या गोष्टी जर  तुमच्या प्रगती साठी गरजेच्या आहेत तर  त्या करण्याकरिता स्वतःला जबरदस्तीने तयार  करा.तुमचे काम साठी तुम्ही अधिक सर्जनशील व्हा (creative ) , तुमच्या कामातील बारकावे तुम्हाला माहित असायला पाहिजेत , त्याप्रमाणे तुमचे सादरीकरणाचे कौशल्य तुम्हाला सुधारावे लागेल कारण जर  चुकले तर आपण पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे उत्कृष्ट सादरीकरणासाठी वरील सर्व गोष्टीवर काम करणे आवश्यक असेल ,कल्पना करा कि तुम्ही परिपूर्ण salesperson आहेत आणि आता "स्वतःची तुलना स्वतःशी करा" .


·         तुमचा दृष्टिकोन  विकसित करा

आपला दृष्टिकोन नेहमी नियंत्रित करता येण्यासारखा असावा ज्या गोष्टींची आपल्याला  भीती वाटते त्यावर विजय मिळवायाला शिका आपल्या यशाला मर्यादित अशा गोष्टीं पासून दूर राहा किंवा त्यांना स्वतःपासून दूर करा तुमच्या विचारांच्या सवयी बदला आणि commitment वर लक्ष द्याउत्साह, चिकाटी, लवचिकता, आनंद आणि आत्मविश्वास या सर्व गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजेत . प्रत्येक गोष्टीचे म्हणजेच commitment चे महत्व ठरवा कोणत्या commitment ला कधी महत्वा द्यायला पाहिजे या वर लक्ष द्या , एक प्राधान्यक्रम ठरवून घ्या , या सर्व सवयीनमुळे आपण एक आदर्श व्यक्ती बानू शकता जे तुम्हाला बनायचे आहे पण त्यासाठी वेळेचे योग्य नियोजन आणि मेहनत या दोन गोष्टी अति आवश्यक असणार आहेत


·         आपला वेळ वाढवा
आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा
तुम्ही जी कृती करणार आहे त्या कृतीचे महत्व आणि गरज समजून घ्या
तुम्ही तुमचे दिवसभराचे एक वेळापत्रक तयार करा त्यातील किती वेळ आपण आपल्या कामासाठी देत आहेत ते समजून घ्या , लक्षात ठेवा जर आपण दिवसातील तास जरी अधिक गुणवत्तेने काम केलेत तरी एका वर्षात तुम्हाला आठवडे अधिक मिळतात . 



इंग्लिश मध्ये असे  आर्टिकल उपलब्ध आहेत गूगल वर त्यातील काही महत्वाचे आर्टिकल  मी आपल्या काही मैत्रिणींसाठी मराठीत भाषांतरित केले आहे ज्यामुळे तुम्हाला यश मिळण्यात मदत होईल वाचून अमलात आणा .. 

धन्यवाद आणि व्यवसाय वृद्धी साठी खूप खूप शुभेच्छा 


Wednesday, July 15, 2020

LECTURE NO 2 : YouTube Chanel कसे तयार करायचे ?

LECTURE NO 2

YouTube Chanel कसे तयार करायचे ?

YouTube हे google च्या मालकीचे आणि अब्जावधी लोकांपर्यंत पोहचणारे व्हीडिओ नेटवर्क आहे , दररोज अब्जावधी लोक YouTube चॅनेल वर काही ना काही गोष्टी शिकत असतात किंवा पाहत असतात त्यामुळे जर आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर आपला चॅनेल हि असणे आवश्यक असते .. या साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला google किंवा YouTube आकारात नाही . मोबाईल मुळे आता व्हिडीओ तयार करणे हि सहज शक्य आहे मोबाईल मध्ये असणाऱ्या विविध अँप्लिकेशन द्वारे अगदी उत्कृष्ट दर्जाचे व्हिडीओ तुम्हाला तयार करता येऊ शकतात आणि या प्रभावी माध्यमामुळे तुम्ही करोडो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची माहिती पोहचवू शकता.. 

YouTube चॅनेल कसे तयार करायचे ते पुढे पाहूया फक्त ३ सोप्या स्टेप्स मध्ये : 

१,. तुमच्याकडे जर तुमचे gmail अकाउंट असेल (म्हणजेच ई-मेल आयडी ) तर youtube चॅनेल तयार करणे अगदी सोपे असते , खालील चित्र पहा 

सर्वात आधी https://www.youtube.com/ हि साईट ओपन करा (खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल )



वरील चित्रात तुम्हाला स्क्रीन मध्ये डाव्या बाजूला "SIGN IN " नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा मग तुमच्या समोर तुमच्या ई-मेल आयडी ची स्क्रीन उघडेल (खालील चित्र पहा )


[पासवर्ड टाकलात आणि NEXT या बटन वर क्लिक केलेत कि , तुमचे YOU-TUBE चॅनेल मध्ये लॉगिन होईल आणि खालील प्रमाणे स्क्रीन तुम्हाला दिसेल


पहिल्या चित्रात डाव्या बाजूला जिथे तुम्हाला SIGN IN असे दिसत होते तिथे आता तुम्हांला तुमचे नाव किंवा ज्या नावाने तुमचा ई-मेल आयडी आहे ते नाव दिसेल . आता त्यावर क्लिक करायचे मग खालील प्रमाणे सेटिंग चे एक छोटे बटन तुम्हाला चौकोनात दिसेल त्यावर क्लिक करायचे .

















सेटिंग वर क्लिक केल्यावर खालील पेज ओपन होईल इथे पहिलीच लाईन लिहिली आहे कि CREATE A CHANNEL त्या वर क्लिक करा .

मग YOU-TUBE तुम्हाला विचारेल कि ,  कि तुमच्या व्यवसायाच्या नावाने तुम्हाला चॅनेल तयार करायचे आहे का ? 
त्या ठिकाणी होय म्हणून स्क्रीन वर CREATE CHANNEL नावाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे आता आपल्या चॅनेल ला नाव द्यायचे आहे . नाव दिल्या नंतर खाली काही पर्याय दिसतील 
  1. Product or Brand
  2. Company Institution or Organization
  3. Arts, Entertainment or Sports
  4. Other

 वरील पैकी कोणत्याही एका पर्यायाला निवडा आणि त्यानंतर DONE या बटन वर क्लिक करा. 

वरील सर्व पायऱ्या व्यवस्थित पूर्ण केल्यात कि , तुम्हाला स्क्रीन वर लिहून येईल Congratulations! You’ve just created a new YouTube channel
आणि खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल 


अशा प्रकारे तुमचा स्वतःचा YOUTUBE चॅनेल तयार झाला आहे आता आपल्या पुढच्या LECTURE मध्ये आपण शिकूया कि व्हिडिओ कसे अपलोड करायचे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचायचे . 






Monday, July 13, 2020

मोफत "ऑनलाईन मार्केटिंग " शिका , (lecture 1 .)

lecture 1 .

प्रश्न क्रं १ : डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

उत्तर : " डिजिटल मार्केटिंग " म्हणजे थोडक्यात सांगायचे तर "ऑनलाईन माध्यमाच्या आधारे केलेली जाहिरात " आहे .

प्रश्न क्रं २ : डिजिटल मार्केटिंग चे फायदे :
उत्तर :
अ. विनाशुल्क किंवा माफक दरात जाहिरात करण्याची सोय.
ब. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम
क. मार्केट मध्ये आपला एक ब्रँड तयार होतो . आपल्या व्यवसायाच्या नावाने लोक आपल्याला ओळखु लागतात .
ड . या मार्केटिंग ला कोणत्याही प्रकारच्या भौगोलिक सीमा नसल्याने जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी या द्वारे आपल्याला मिळते .

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हि ऑनलाईन माध्यमे खालील प्रमाणे :

१. Email Marketing  :

२. SMS Marketing :

३. Facebook Advt  :

४. Google Advt :

५. YouTube Channel :

६. Blog :

७. whats app marketing :

८. Website :

९ . Instagram Marketing :

व्यवसाय कोणताही असुद्या पण त्याची जाहिरात जर वरील माध्यमांद्वारे तुम्ही सुरु केलीत तर त्यातून उत्पन्न वाढण्यास आपोआप सुरवात होते ..

वरील माध्यमांच्या द्वारे जाहिराती पैसे भरून किंवा पैसे खर्च न करता हि तुम्हाला करता येतात. कसे ते आपण पुढे पाहणारच आहोत . पण त्याआधी मला सर्वानी खालील प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे .

१) तुमच्या व्यवसायाची जाहिरात सध्या तुम्ही कशी करत आहात ?
२) वरील ९ माध्यमांपैकी तुम्हाला कोणत्या माध्यमांबद्दल सविस्तर माहिती आहे.?
३) कोणते माध्यम तुम्हाला शिकायला आवडेल ?
४) सध्या तुम्ही ज्या ऑनलाईन माध्यमांद्वारे व्यवसायाचे प्रोमोशन करता तेथे तुमचे personal आणि business असे वेगवेगळे अकाउंट आहेत कि , तुम्ही व्हाट्सअप , फेसबुक , प्रमोशन हे तुमचे पर्सनल अकाउंट वापरूनच करता का ?


वरील प्रश्नांच्या उत्तरांसोबत च तुमच्या व्यवसाया बद्दल मला थोडक्यात माहिती द्या , म्हणजे आपण जेव्हा पुढील शिक्षण सुरु करू तेव्हा त्या प्रमाणे आपल्याला उदाहरणे घेता येतील .



Monday, July 6, 2020

" मोफत ऑनलाईन मार्केटिंग शिका "



मोफत  "ऑनलाईन मार्केटिंग "  शिका 
(फक्त महिलांसाठी साठी)


नमस्कार , मैत्रिणींनो ..


                 सध्या करोना या आजारामुळे सर्वजण घरातून किंवा ऑनलाईन पद्धतीने काम करण्याला पसंती देत आहे .. त्यामुळे "ऑनलाईन मार्केटिंग " करता येणे खूपच आवश्यक आहे ..

                 "कोणताही व्यवसाय सुरु करणे खूप सोपे असते , पण त्याचे योग्य मार्केटिंग झाले नाही तर तो व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही" . वस्तूं किंवा सेवांचा दर्जा किती हि चांगला असला तरी जोपर्यंत त्याची माहिती भरपूर लोकांपर्यंत पोहचणार नाही तो पर्यंत तो व्यवसाय यशस्वी होण्यात अडचणी येतच राहणार .
आता प्रश्न हा आहे कि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायचे कसे ? तर यासाठी उत्तम मार्ग म्हणजे "ऑनलाईन मार्केटिंग " हा आहे ..

           यात "ब्लॉग , फेसबुक , youtube चॅनेल , " या ३ माध्यमांद्वारे तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकता.. .. जर तुम्हाला मोफत "ऑनलाईन मार्केटिंग "  कसे करायचे हे शिकायचे असेल तर आजच संपर्क करा. (फक्त महिलांसाठी)

हेमा यादव-कदम - ७८७५५५०७८९ . , हडपसर पुणे २८. 

Tuesday, June 30, 2020

" स्वतःचा ब्लॉग तयार करणे "

नमस्कार ,

मी हेमलता यादव-कदम (भोसले गार्डन सोसायटी, हडपसर-२८),

घरी बसून काही तरी उद्योग व्यवसाय करू पाहणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींसाठी हि माहिती मी देत आहे .. ज्यांना यशस्वी तर व्हायचंय पण योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये.. संपूर्ण लेख नक्की वाचा कदाचित तुम्हाला हि याचा फायदा होईल . 

मैत्रिणींनो तुमची सर्वांची मेहनत खूपच उल्लेखनीय आहे .. आणि त्या मेहनतीला तुम्ही जर योग्य स्वरूप दिलेत तर तुमच्या व्यवसायात वृद्धी होण्यास तुम्हाला मदत होईल. 
बऱ्याच महिला त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करताना खूप फोटोंचा वापर करतात. त्या मुळे खरेदी करणाऱ्या महिला कधी-कधी सर्व फोटो उघडून पाहत नाहीत .. जर लोकांनी आपली माहिती पूर्ण पहिली नाही तर त्यातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळायला अडचण येते .. आपल्याला जर आपल्या व्यवसायाची माहिती थोडक्यात पण अचूकपणे मांडता आली तर आपल्याला प्रतिसाद हि तसाच म्हणजे उत्तम प्रकारे मिळतो . सध्या ग्राहक दुकानात जाऊन काही खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीला अधिक महत्व देत आहेत. मग आपले ऑनलाईन सादरीकरण चांगले असायला हवे ना .. याच सादरीकरणासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे  " स्वतःचा ब्लॉग तयार करणे " 

ब्लॉग चे फायदे : 

१. फोटो आणि माहिती टाकण्याची मर्यादा नाही 

२. १५ - २० फोटो पाठ्वण्याऐवजी एक लिंक पाठवणे कधी हि सोपे असते,

        A.  त्यामुळे व्हाट्सअप ग्रुप मध्ये खूप फोटो ऐवजी थोडी माहिती आणि लिंक असे पाठवले तर ते अधिक प्रोफेशनल दिसेल. 
        B. शिवाय माहिती पाठवताना काही राहिले किंवा जास्तच पाठवले अशा चुका होणार नाही. 
        C. हि लिंक स्टेटस ला हि ठेवता येते . 
        D. आपल्या कामाची सविस्तर माहिती असल्याने ग्राहकांना खरेदी चा निर्णय पटकन घेता येतो . 
( उदा. साठी  पुढील लिंक ओपन करून पहा . https://recipesforgr8health.blogspot.com/ )

३. सध्या सर्वच लोक ऑनलाईन पद्धतीने पुढे जात असल्याने तुम्ही जर तुमच्या "व्यवसायाचे सादरीकरण " चांगल्या पद्धतीने केले . तर तुमच्या वस्तूनाही चांगली मागणी येईल . 

४. शिवाय तुमच्या  ब्लॉग वर खूप लोक येत राहिली तर तुम्हाला ब्लॉग तर्फे काही जाहिराती मिळतात आणि ब्लॉग कडून त्या जाहिराती चे पैसे हि तुम्हाला दिले जातात .. 
म्हणजेच तुमचा जास्त फायदा ब्लॉग तयार करण्याने होतो .. 

५. ब्लॉग तयार करायला सुरवातीला तुम्हाला कोणतेही शुल्क नसते . फक्त ई-मेल आय डी असावा लागतो . 

६. ब्लॉग म्हणजे तुमचे ऑनलाईन असे दुकान आहे ज्याचे rent , lightbill , तुम्हाला दर महिना अजिबात भरावे लागणार नाही .. 

ब्लॉग तुम्ही स्वतः हि तयार करू शकता त्यासाठी पुढे एक साईट  दिली आहे www.blogger.com

तुम्हा सर्वांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी माझ्याकडून सर्व मैत्रिणींना एक छोटासा सल्ला आणि  खूप खूप सदिच्छा. (All The Best). 




Search Results

Web result with site links