Thursday, July 16, 2020

" सेल (विक्री) वाढवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स " (lecture 3)


ऑनलाईन मार्केटिंग शिकल्यानंतर खूप जास्त ग्राहकांपर्यंत कसे पोहचायचे हे कळेल पण त्यापुढे प्रश्न उभा राहतो तो विक्रीचा आपण जी सेवा किंवा वस्तू विकणार आहोत .  ती जास्तीत जास्त लोकांनी खरेदी करावी या साठी काही महत्वाच्या टिप्स .. आपल्या कडे फक्त कला असून चालत नाही तर ती कला योग्य पध्दतीने सादर करता यायला पाहिजे ..  


·         आपले मिशन (उद्देश) / आणि व्हिजन स्पष्ट असावे
जो व्यवसाय आपण सुरु करणार आहेत त्या व्यवसायातील बारकावे सर्व प्रथम समजून घ्या ,

·         आपण इतरांपेक्षा सर्वोत्तम का आहोत ?
·         तुम्ही जे काम करत आहेत त्याची जास्त गरज कोणाला आहे ?
·         तुमच्या कामातील स्वर्वोत्तम शक्यता काय आहेत ?
·         तुमचा ग्राहक तुमच्याकडे किती पैसे भरू शकतो ?

जर वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज पाने मिळत नसतील तर तुम्हाला तुमच्या कामात अधिक स्पष्टता आणण्यासाठी आणि तुमचे ध्येय गाठण्यासाठी एखादी मोहीम राबवणे आवश्यक राहील .

  •     आपले ध्येय किंवा मिशन विशिष्ट विभागात विभागून घ्या !

  •  रोजच्या कामाचा आराखडा लिहून काढा ( दररोज किती कॉल करणार , किती प्रोपोसल दर महिना सेल करणार बिलिंग किती करणार .) या सर्व गोष्टी आपल्या हातात असणार आहेत .
  • तुम्हाला अपेक्षित असणारा निकाल तुम्ही लिहून काढा (दर महिना किती सेल झाले , प्रत्येक बिल ची अमाऊंट काय होती , प्रत्येक सेल नंतर झालेला तुमचा प्रॉफिट किती झाला ? )


तुमची प्रगती झपाट्याने होण्यासाठी वरील दोन गोष्टींचा लक्ष पूर्वक सातत्याने अभ्यास करा आणि गरज असेल ते सर्व बदल करा तुमच्या कामाचा वेग वाढवा , जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्ही उत्साही पणे  तुमचे काम यशस्वी रित्या पूर्ण करू शकाल

·         ग्राहकाची गरज ओळखायला शिका

·         ग्राहक नेहमी तेच खरेदी करतात ज्या गोष्टींची त्यांना "खूप गरज" असते ?
·         त्यांची गरज लक्षात घेऊन तुम्ही त्यांना कसे समजाऊ शकता ?
·         जर ग्राहकाला तुमच्या सेवा त्याच्या साठी योग्य वाटल्या तर ते पैसे खर्च करतात त्यामुळे तुम्ही तुमच्या सेवांच्या वैशिष्ट्यांवर भर द्या .
·         तुमच्या सेवांमध्ये गरजेनुसार आवश्यक ते बदल करा

·         ग्राहकाचे लक्ष वेधून घ्या आणि ते टिकवून  ठेवायला शिका
1.    उत्कृष्ट जाहिरातबाजी
2.    संदर्भ
3.    उत्कृष्ट विक्री कौशल्य
4.    आणि धोरणात्मक म्हणजेच (योग्य प्रश्न विचारण्याचे कौशल्य )
या महत्वाच्या गोष्टी जर आपल्या संवादात असतील तर आपण ग्राहकाचे लक्ष आपल्याकडे टिकून ठेऊ शकतो ,

·         विक्री करण्याआधी हेतू स्पष्ट असायला पाहिजे
आपण जे काम करत आहेत ते करताना गोष्टी नेहमी लक्षात असुद्या कि आपण ) काय करत आहेत आणि ) का करत आहेत
1.    तुम्ही ग्राहक म्हणून कोणाला लक्ष (टार्गेट ) करत आहेत आणि का?
2.    आपण त्यांना काय सांगणार आणि का?
3.    आपण त्यांना काय विचारणार आणि का?
4.    आपला प्रस्ताव काय असेल  आणि का?
5.    आपण ऑर्डरची मागणी कधी करणार आहात?
विक्री करताना प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला स्वत: ला खात्री नसेल किंवा वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आत्मविश्वासाने देता येत नसतील तर समजून घ्या कि तुम्हाला प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन घेण्याची गरज आहे

·         विचारा, ऐका आणि कृती करा
या तीन गोष्टी सेल्स मध्ये खूप महत्वाच्या असतात
आपण जे प्रश्न विचारणार आहेत ते विषयाशी संबंधित , थेट , नियोजनबद्ध आणि ग्राहकाला विचार करण्यास प्रवृत्त करतील असे असावेत
तुमची ऐकण्याची क्षमता बऱ्यापैकी विकसित असणे महत्वाचे असते , जर आपण ग्राहकाची समस्या लक्ष पूर्वक एऐकू शकलात तर आणि तरच तुम्ही त्याला योग्य सेवा सुचवू शकता.
सेवा सुचवल्यानंतर त्यांना ती घेण्याची किती गरज आहे हे पटवून द्या आणि लगेचच सेल करून घ्या


·         जबाबदारी घ्या पण श्रेय घेऊ नका
जर आपण एखाद्या ग्रुप चे नेते असाल तर एक खूप चांगला संघ बनवणे हे तुमच्या हातात असते कंपनी तुमच्या सर्व कामांसाठी तुम्हाला योग्य ते सहकार्य करते तुमच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत देखील करते , तुम्ही दाखवलेल्या दिशेने तुमचा संघ आणि कंपनी मार्गक्रमण करत असते त्यामुळे तुम्ही जबाबदारी घेणे आवश्यक असते काम चांगले झाले तर सर्वाना त्याचे श्रेय द्या पण जर त्यात काही चुकले तर मोठेपणाने त्याची जबादारी घ्या


·         मूलभूत गोष्टींवर कार्य करा.
स्वतः मध्ये सुधारणा करण्याची गरज सर्वोत्तम व्यक्तीला देखील असते ,तुमच्यामधील काही कमतरता शोधून त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घ्या, आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत पण त्या गोष्टी जर  तुमच्या प्रगती साठी गरजेच्या आहेत तर  त्या करण्याकरिता स्वतःला जबरदस्तीने तयार  करा.तुमचे काम साठी तुम्ही अधिक सर्जनशील व्हा (creative ) , तुमच्या कामातील बारकावे तुम्हाला माहित असायला पाहिजेत , त्याप्रमाणे तुमचे सादरीकरणाचे कौशल्य तुम्हाला सुधारावे लागेल कारण जर  चुकले तर आपण पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे उत्कृष्ट सादरीकरणासाठी वरील सर्व गोष्टीवर काम करणे आवश्यक असेल ,कल्पना करा कि तुम्ही परिपूर्ण salesperson आहेत आणि आता "स्वतःची तुलना स्वतःशी करा" .


·         तुमचा दृष्टिकोन  विकसित करा

आपला दृष्टिकोन नेहमी नियंत्रित करता येण्यासारखा असावा ज्या गोष्टींची आपल्याला  भीती वाटते त्यावर विजय मिळवायाला शिका आपल्या यशाला मर्यादित अशा गोष्टीं पासून दूर राहा किंवा त्यांना स्वतःपासून दूर करा तुमच्या विचारांच्या सवयी बदला आणि commitment वर लक्ष द्याउत्साह, चिकाटी, लवचिकता, आनंद आणि आत्मविश्वास या सर्व गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजेत . प्रत्येक गोष्टीचे म्हणजेच commitment चे महत्व ठरवा कोणत्या commitment ला कधी महत्वा द्यायला पाहिजे या वर लक्ष द्या , एक प्राधान्यक्रम ठरवून घ्या , या सर्व सवयीनमुळे आपण एक आदर्श व्यक्ती बानू शकता जे तुम्हाला बनायचे आहे पण त्यासाठी वेळेचे योग्य नियोजन आणि मेहनत या दोन गोष्टी अति आवश्यक असणार आहेत


·         आपला वेळ वाढवा
आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा
तुम्ही जी कृती करणार आहे त्या कृतीचे महत्व आणि गरज समजून घ्या
तुम्ही तुमचे दिवसभराचे एक वेळापत्रक तयार करा त्यातील किती वेळ आपण आपल्या कामासाठी देत आहेत ते समजून घ्या , लक्षात ठेवा जर आपण दिवसातील तास जरी अधिक गुणवत्तेने काम केलेत तरी एका वर्षात तुम्हाला आठवडे अधिक मिळतात . 



इंग्लिश मध्ये असे  आर्टिकल उपलब्ध आहेत गूगल वर त्यातील काही महत्वाचे आर्टिकल  मी आपल्या काही मैत्रिणींसाठी मराठीत भाषांतरित केले आहे ज्यामुळे तुम्हाला यश मिळण्यात मदत होईल वाचून अमलात आणा .. 

धन्यवाद आणि व्यवसाय वृद्धी साठी खूप खूप शुभेच्छा 


2 comments: